ग्रामस्थाने बंद केलेली पायवाट खुली करून मिळावी

ग्रामस्थाने बंद केलेली पायवाट खुली करून मिळावी

सावंत कुटुंबीय बसलं सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाला
सावंतवाडी । प्रतिनिधी
पारंपरिक पायवाट खुली करून मिळावी यासाठी निगुडे- देऊळवाडी येथील शंकर सावंत हे आपल्या कुटुंबीयांसह तहसीलदार कार्यालयासमोर गुरुवारी उपोषणास बसले आहेत . ग्रामपंचायत रस्त्याच्यालगत सावंत यांचे घर आहे या घराकडे जाण्यासाठी पारंपारिक पायवाट होती. परंतु तेथीलच एका ग्रामस्थाने ही पायवाट बंद केली. ही पायवाट खुली करुन मिळावी यासाठी सावंत यांनी उपोषणाचा इशारा दिला होता . परंतु याबाबत उपाययोजना न झाल्यामुळे त्याने तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.