छत्रपती शिवाजी टर्मिनसला बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात
छत्रपती शिवाजी टर्मिनसवर आरडीएक्स आढळले असून स्थानकाला बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी मुंबईच्या जीआरपी नियंत्रण कक्षाला अज्ञाता कडून देण्यात आली होती. नंतर गोंधळ उडाला. काल संध्याकाळी एका निनावी नंबरावरून कॉल आला आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस मध्ये आरडीएक्स ठेवल्याचे सांगण्यात आले. नंतर शोधल्यावर काहीच सापडले नाही.
हा कॉल कोणी केला हे शोध घेतल्यावर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीचा लोकेशन शोध घेण्याचा प्रयत्न केल्या वर त्याचे लोकेशन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ आढळून आले. जीआरपीने आरोपीला ताब्यात घेतले. असून सचिन शिंदे असे त्याचे नाव आहे. त्याने धमकीका दिली पोलीस शोध घेत आहे.
Edited by – Priya Dixit