मुख्यमंत्र्यांनी घेतले पंढपुरात श्री विठ्ठलाचे दर्शन

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंढरपूर येथील प्रसिद्ध विठ्ठल ऊक्मिणी मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले आणि गोमंतकीय जनतेसाठी प्रार्थना केली. त्यावेळी मंदिर समितीच्यावतीने कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते शाल, श्रीफळ तसेच विठ्ठल – ऊक्मिणीची मूर्ती देऊन डॉ. सावंत यांचा सत्कार करण्यात आला. भाजपचे पदाधिकारी नरेंद्र सावईकर हे त्यांच्यासमवेत उपस्थित होते. डॉ. सावंत […]

मुख्यमंत्र्यांनी घेतले पंढपुरात श्री विठ्ठलाचे दर्शन

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंढरपूर येथील प्रसिद्ध विठ्ठल ऊक्मिणी मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले आणि गोमंतकीय जनतेसाठी प्रार्थना केली. त्यावेळी मंदिर समितीच्यावतीने कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते शाल, श्रीफळ तसेच विठ्ठल – ऊक्मिणीची मूर्ती देऊन डॉ. सावंत यांचा सत्कार करण्यात आला. भाजपचे पदाधिकारी नरेंद्र सावईकर हे त्यांच्यासमवेत उपस्थित होते. डॉ. सावंत यांनी आळंदी – पुणे येथून पंढरपुरात दाखल झालेल्या ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन घेतले. राज्याच्या विकासासाठी लोकांना आनंदी, सुखी, समाधानी ठेव, असे गाऱ्हाणे त्यांनी विठ्ठल-ऊक्मिणी चरणी घातले. मंदिर समितीतर्फे डॉ. सावंत यांचे स्वागत करण्यात आले.