ठाणे : मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णात वाढ
ठाणे जिल्ह्यात मलेरिया आणि डेंग्यूने थैमान घातले आहे. गेल्या दोन महिन्यांत मलेरियाचे 653 तर डेंग्यूचे 505 रुग्ण आढळून आले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात मलेरिया, डेंग्यूसोबतच अतिसाराचे 106, स्वाइन फ्लूचे 27 आणि लेप्टोचे 6 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात साथीच्या आजारांनी थैमान घातले असल्याचे चित्र आहे.पावसाळ्यात मलेरिया, डायरिया, डेंग्यू, स्वाइन फ्लू, लेप्टो यासारखे साथीचे आजार वाढतात. या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे महानगरपालिका (TMC) तसेच जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती मोहीम राबविण्यात येते.पोस्टरच्या माध्यमातून साथीचे आजार टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत जनजागृती केली जाते. त्याचवेळी शहरात धूर फवारणी केली जात आहे. घरोघरी पाणीसाठा तपासला जातो. त्यात डासांच्या अळ्या आढळून आल्यास त्या नष्ट केल्या जातात. यंदाही अशा प्रकारच्या उपाययोजना राबवण्यात आल्या असल्या तरी जिल्ह्यात साथीच्या आजारांचे चित्र पाहायला मिळत आहे.ठाणे जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत 2 लाख 6 हजार 288 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी 653 रुग्णांना मलेरियाचे निदान झाले. यामध्ये जुलै महिन्यात 284 तर ऑगस्ट महिन्यात 369 रुग्ण आढळून आले आहेत. तर, 1,486 डेंग्यू संशयित रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली. यामध्ये 505 रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले. यामध्ये जुलै महिन्यात 250 तर ऑगस्ट महिन्यात 255 रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्येच्या आकडेवारीचा विचार केल्यास ऑगस्ट महिन्यात मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते.ठाणे महापालिका क्षेत्रात साथीचे आजारठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या तीन महिन्यांत मलेरियाचे 249 रुग्ण आढळून आले आहेत. जुलै महिन्यापासून या रुग्णांची संख्या वाढू लागली असून जुलै महिन्यात 93 तर ऑगस्ट महिन्यात 135 रुग्ण आढळून आले आहेत. जूनमध्ये डेंग्यूचे 9, जुलैमध्ये 31 आणि ऑगस्टमध्ये 38 रुग्ण आढळून आले आहेत. जुलै महिन्यात काविळीचे 3 रुग्ण आढळले असून ऑगस्ट महिन्यात एकही रुग्ण आढळला नाही. जूनमध्ये स्वाइन फ्लूचे 8, जुलैमध्ये 133 आणि ऑगस्टमध्ये 27 रुग्ण आढळून आले आहेत. जूनमध्ये लेप्टोचा 1, जुलैमध्ये 23 आणि ऑगस्टमध्ये 6 रुग्ण आढळले आहेत.हेही वाचामलेरिया, डेंग्यू आजारांसाठी 24 ठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन
सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये ‘मंकीपॉक्स’साठी 14 खाटांचा विशेष वॉर्ड
Home महत्वाची बातमी ठाणे : मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णात वाढ
ठाणे : मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णात वाढ
ठाणे जिल्ह्यात मलेरिया आणि डेंग्यूने थैमान घातले आहे. गेल्या दोन महिन्यांत मलेरियाचे 653 तर डेंग्यूचे 505 रुग्ण आढळून आले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात मलेरिया, डेंग्यूसोबतच अतिसाराचे 106, स्वाइन फ्लूचे 27 आणि लेप्टोचे 6 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात साथीच्या आजारांनी थैमान घातले असल्याचे चित्र आहे.
पावसाळ्यात मलेरिया, डायरिया, डेंग्यू, स्वाइन फ्लू, लेप्टो यासारखे साथीचे आजार वाढतात. या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे महानगरपालिका (TMC) तसेच जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती मोहीम राबविण्यात येते.
पोस्टरच्या माध्यमातून साथीचे आजार टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत जनजागृती केली जाते. त्याचवेळी शहरात धूर फवारणी केली जात आहे. घरोघरी पाणीसाठा तपासला जातो. त्यात डासांच्या अळ्या आढळून आल्यास त्या नष्ट केल्या जातात.
यंदाही अशा प्रकारच्या उपाययोजना राबवण्यात आल्या असल्या तरी जिल्ह्यात साथीच्या आजारांचे चित्र पाहायला मिळत आहे.
ठाणे जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत 2 लाख 6 हजार 288 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी 653 रुग्णांना मलेरियाचे निदान झाले. यामध्ये जुलै महिन्यात 284 तर ऑगस्ट महिन्यात 369 रुग्ण आढळून आले आहेत.
तर, 1,486 डेंग्यू संशयित रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली. यामध्ये 505 रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले. यामध्ये जुलै महिन्यात 250 तर ऑगस्ट महिन्यात 255 रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्येच्या आकडेवारीचा विचार केल्यास ऑगस्ट महिन्यात मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते.
ठाणे महापालिका क्षेत्रात साथीचे आजार
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या तीन महिन्यांत मलेरियाचे 249 रुग्ण आढळून आले आहेत. जुलै महिन्यापासून या रुग्णांची संख्या वाढू लागली असून जुलै महिन्यात 93 तर ऑगस्ट महिन्यात 135 रुग्ण आढळून आले आहेत.
जूनमध्ये डेंग्यूचे 9, जुलैमध्ये 31 आणि ऑगस्टमध्ये 38 रुग्ण आढळून आले आहेत. जुलै महिन्यात काविळीचे 3 रुग्ण आढळले असून ऑगस्ट महिन्यात एकही रुग्ण आढळला नाही.
जूनमध्ये स्वाइन फ्लूचे 8, जुलैमध्ये 133 आणि ऑगस्टमध्ये 27 रुग्ण आढळून आले आहेत. जूनमध्ये लेप्टोचा 1, जुलैमध्ये 23 आणि ऑगस्टमध्ये 6 रुग्ण आढळले आहेत.हेही वाचा
मलेरिया, डेंग्यू आजारांसाठी 24 ठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजनसेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये ‘मंकीपॉक्स’साठी 14 खाटांचा विशेष वॉर्ड