टाटा मुंबई मॅरेथॉन 21 जानेवारीला
वृत्तसंस्था/ मुंबई
19 वी टाटा पुरस्कृत मुंबई मॅरेथॉन 21 जानेवारीला आयोजित केली आहे. या मॅरेथॉनमध्ये जगातील अव्वल दर्जाचे धावपटू सहभागी होणार असून विद्यमान विजेते आणि विक्रमवीर इथोपियाचे हेली लीमे बेरहेनू आणि अंचिलेम हेमेनोत यांच्यासह अनेक धावपटू सहभागी होणार आहेत. गेल्या वर्षी बेहरूने 2 तास 07 मिनिटे आणि 32 सेकंद तसेच हेमेनोतने 2 तास 24 मिनिटे आणि 15 सेकंदाचा अवधी घेत अनुक्रमे पुरूष आणि महिला विभागातील अजिंक्यपदे मिळविली होती. त्यांनी या मॅरेथॉनमध्ये नवा विक्रमही केला होता.
या स्पर्धेतील विजेत्यांसाठी एकूण 405,000 अमेरिकन डॉलर्सचे बक्षिस ठेवण्यात आले आहे. पुरूष आणि महिला विभागातील विजेत्यांना प्रत्येकी 50 हजार डॉलर्स तर उपविजेत्यांना प्रत्येकी 25 हजार डॉलर्स तसेच तृतीय क्रमांकावरील विजेत्यांना प्रत्येकी 10 हजार डॉलर्सचे बक्षिस देण्यात येणार आहे. मुंबई मॅरेथॉनमध्ये यापूर्वी नोंदविलेले विक्रम मोडणाऱ्यांसाठी एकूण 15 हजार डॉलर्सची बोनस रक्कम राखीव ठेवण्यात आली आहे.
Home महत्वाची बातमी टाटा मुंबई मॅरेथॉन 21 जानेवारीला
टाटा मुंबई मॅरेथॉन 21 जानेवारीला
वृत्तसंस्था/ मुंबई 19 वी टाटा पुरस्कृत मुंबई मॅरेथॉन 21 जानेवारीला आयोजित केली आहे. या मॅरेथॉनमध्ये जगातील अव्वल दर्जाचे धावपटू सहभागी होणार असून विद्यमान विजेते आणि विक्रमवीर इथोपियाचे हेली लीमे बेरहेनू आणि अंचिलेम हेमेनोत यांच्यासह अनेक धावपटू सहभागी होणार आहेत. गेल्या वर्षी बेहरूने 2 तास 07 मिनिटे आणि 32 सेकंद तसेच हेमेनोतने 2 तास 24 मिनिटे […]