महाराष्ट्रातील अंबरनाथ मध्ये हिट एंड रन, SUVचालकाने अनेकांना चिरडले

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये भीषण घटना घडली आहे. एका व्यक्तीने रस्त्यावर उभ्या असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या कारने धडक दिली आणि त्याला लांबपर्यंत ओढून नेले. तसेच न थांबता एका कारलाही धडक दिली. या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर …

महाराष्ट्रातील अंबरनाथ मध्ये हिट एंड रन, SUVचालकाने अनेकांना चिरडले

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये भीषण घटना घडली आहे. एका व्यक्तीने रस्त्यावर उभ्या असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या कारने धडक दिली आणि त्याला लांबपर्यंत ओढून नेले. तसेच न थांबता एका कारलाही धडक दिली. या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला असून तो सोशल मीडियावर वायरल झाला आहे.

 

अंबरनाथमध्ये घडलेल्या या अपघातामध्ये काळ्या रंगाच्या SUVचालकाने एका व्यक्तीला 100 मीटर अंतरापर्यंत खेचत नेले. यानंतर त्याने पार्क केलेल्या वाहनाला जोरदार धडक दिली.  

 

ठाण्यातील अंबरनाथमध्ये हे हिट एंड रन प्रकरण घडले आहे. काळ सकाळी अकराच्या सुमारास अंबरनाथ जांभूळ फाट्याजवळ ही भीषण घटना घडली. या घटनेत जखमी झालेल्या 4 जणांना नागरिकांना घटनास्थळावरून बाहेर काढले. व पोलिसांना सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच पोलीस तपास करीत आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

Go to Source