सनरायझर्स इस्टर्न केपचे जेतेपद

वृत्तसंस्था/ केपटाऊन दक्षिण आफ्रिकेत झालेल्या दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेचे सनरायझर्स इस्टर्न केपने पाठोपाठ सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकाविले. न्यूलँड्स येथे झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात सनरायझर्स इस्टर्न केपने दरबान सुपर जायंट्सचा 89 धावांनी पराभव केला. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात सनरायझर्स इस्टर्न केपने 20 षटकात 3 बाद 204 धावा जमवित दरबान सुपर जायंट्सला विजयासाठी 205 धावांचे कडवे […]

सनरायझर्स इस्टर्न केपचे जेतेपद

वृत्तसंस्था/ केपटाऊन
दक्षिण आफ्रिकेत झालेल्या दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेचे सनरायझर्स इस्टर्न केपने पाठोपाठ सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकाविले. न्यूलँड्स येथे झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात सनरायझर्स इस्टर्न केपने दरबान सुपर जायंट्सचा 89 धावांनी पराभव केला.
या स्पर्धेतील अंतिम सामन्यात सनरायझर्स इस्टर्न केपने 20 षटकात 3 बाद 204 धावा जमवित दरबान सुपर जायंट्सला विजयासाठी 205 धावांचे कडवे आव्हान दिले. सनरायझर्स संघातील टॉम अॅबेल आणि ट्रिस्टेन स्टब्जने शानदार अर्धशतके झळकाविली. अॅबेलने 55 तर स्टब्जने नाबाद 56 धावा झळकाविल्या. हर्मन आणि कर्णधार मार्कक्रेम यांनी प्रत्येकी 42 धावांचे योगदान दिले. त्यानंतर सनरायझर्स इस्टर्नच्या भेदक गोलंदाजीसमोर दरबान सुपर जायंट्सचा डाव 17 षटकात 115 धावात आटोपला. सनरायझर्स इस्टर्नच्या जेनसेनने 30 धावात 5 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक – सनरायझर्स इस्टर्न केप 20 षटकात 3 बाद 204 (अॅबेल 55, स्टब्ज नाबाद 56, हर्मन 42, मार्कक्रेम 42). दरबान सुपर जायंट्स 17 षटकात सर्व बाद 115 (मुल्डेर 38, जेनसेन 5-30).