मुंबई (mumbai) महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर 3601 सूचना व हरकती पालिकेच्या संकेतस्थळावर नोंदविल्या आहेत. या सूचना व हरकतींच्या अनुषंगाने अंतिम निर्णय काय होणार, याकडे मतदार, तसेच राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.मुंबई महापालिकेच्या (brihanmumbai municipal corporation) आगामी निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी जाहीर करण्यात आली. प्रारुप मतदार यादीवर 3 डिसेंबरपर्यंत हरकती व सूचना नोंदवण्यात येणार आहे. त्यांनतर 10 डिसेंबरला अंतिम मतदार (voters) यादी जाहीर होईल. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या सर्व हरकती व सूचनांची गांभीर्यपूर्वक दखल घेण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी पूर्वीच अधिकाऱ्यांना दिले आहेत.मतदारयादीमध्ये दुबार नावे आणि वगळलेली नावे चिन्हांकित करण्यात आली आहेत. तसेच, मतचोरीच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे यंदा मतदार यादीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पालिकेच्या (bmc) सर्व विभागांमधून प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादीवर 20 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत एकूण 3 हजार 601 हरकती व सूचना प्राप्त झाल्यायाआधी 20 ते 25 नोव्हेंबर दरम्यान एकूण 769 हरकती व सूचना नोंदविण्यात आल्या होत्या. त्यात पालिकेच्या एम पूर्व आणि टी विभागातून सर्वाधिक म्हणजेच प्रत्येकी 204 व 123 हरकती प्राप्त झाल्या. त्यांनतर, 26 नोव्हेंबर रोजी 1371, 27 नोव्हेंबर रोजी 668, 28 नोव्हेंबर रोजी 362, 29 नोव्हेंबर रोजी 373 आणि 30 नोव्हेंबर रोजी केवळ 58 सूचना व हरकती मतदारांनी नोंदविल्या. सूचना व हरकती नोंदवण्यासाठी 3 डिसेंबर हा अंतिम दिवस असणार आहे.
मुंबई महापालिका निवडणूकीवर ‘इतकी’ सूचना आणि हरकतींची नोंद
