शिवशाही बसचा अपघात, 12 जणांचा मृत्यू
विदर्भातील गोंदिया (gondia) ते सडक अर्जुनी मार्गावर डव्वा गावाजवळ एसटीची (msrtc) शिवशाही (shivshahi) बस उलटली. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 30 जण जखमी झाले आहेत. तसेच इतर प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गोंदिया- सडक अर्जुनी मार्गावर डव्वा गावाजवळच्या मुर्दाली जंगल परिसरातून एसटीची शिवशाही (shiv shahi) बस जात होती. बसची गती मर्यादेहून खूप जास्त होती. तेव्हा अचानक बसने पलटी घेतली. त्यानंतर बस बऱ्याच अंतरापर्यंत एकाबाजूने घासत गेली. या घटनेत बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले. या अपघाताची (accident) माहिती कळताच आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाश्यांना वाचवण्याचे काम हाती घेतले.दरम्यान बसमध्ये अडकलेल्या प्रवाश्यांना काढण्यासाठी नागरिकांकडून बसमधील काचाही फोडण्यात आल्या. वृत्त हाती येईपर्यंत बसमधील सुमारे 8 मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. पोलिसांनीही घटनेचे गांभिर्य बघता तेथे धाव घेत बंदोबस्त वाढवला. बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून मृतांची संख्या आणखीन वाढण्याची शक्यता आहे.अपघाताची माहिती कळताच एसटी महामंडळ, प्रादेशिक परिवहन विभागासह (आरटीओ) इतरही शासकीय यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर दुसरीकडे अपघातग्रस्त बसमधील जखमींना प्रथमोपचारासाठी जवळच्या गोरेगाव व सडक अर्जुनीतील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. तसेच काही गंभीर रुग्णांना इतरत्र रुग्णालयात तातडीने हलवण्यात आल्याची माहिती उपस्थितांनी दिली. हेही वाचाADR अहवालानुसार, भाजपकडे सर्वाधिक श्रीमंत आमदारमुंबईतील 4 ठिकाणी बहुस्तरीय रोबोटिक पार्किंग टॉवर उभारण्यात येणार
Home महत्वाची बातमी शिवशाही बसचा अपघात, 12 जणांचा मृत्यू
शिवशाही बसचा अपघात, 12 जणांचा मृत्यू
विदर्भातील गोंदिया (gondia) ते सडक अर्जुनी मार्गावर डव्वा गावाजवळ एसटीची (msrtc) शिवशाही (shivshahi) बस उलटली. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 30 जण जखमी झाले आहेत. तसेच इतर प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, गोंदिया- सडक अर्जुनी मार्गावर डव्वा गावाजवळच्या मुर्दाली जंगल परिसरातून एसटीची शिवशाही (shiv shahi) बस जात होती. बसची गती मर्यादेहून खूप जास्त होती. तेव्हा अचानक बसने पलटी घेतली. त्यानंतर बस बऱ्याच अंतरापर्यंत एकाबाजूने घासत गेली.
या घटनेत बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले. या अपघाताची (accident) माहिती कळताच आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाश्यांना वाचवण्याचे काम हाती घेतले.
दरम्यान बसमध्ये अडकलेल्या प्रवाश्यांना काढण्यासाठी नागरिकांकडून बसमधील काचाही फोडण्यात आल्या. वृत्त हाती येईपर्यंत बसमधील सुमारे 8 मृतदेह बाहेर काढण्यात आले होते.
पोलिसांनीही घटनेचे गांभिर्य बघता तेथे धाव घेत बंदोबस्त वाढवला. बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून मृतांची संख्या आणखीन वाढण्याची शक्यता आहे.
अपघाताची माहिती कळताच एसटी महामंडळ, प्रादेशिक परिवहन विभागासह (आरटीओ) इतरही शासकीय यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर दुसरीकडे अपघातग्रस्त बसमधील जखमींना प्रथमोपचारासाठी जवळच्या गोरेगाव व सडक अर्जुनीतील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.
तसेच काही गंभीर रुग्णांना इतरत्र रुग्णालयात तातडीने हलवण्यात आल्याची माहिती उपस्थितांनी दिली. हेही वाचा
ADR अहवालानुसार, भाजपकडे सर्वाधिक श्रीमंत आमदार
मुंबईतील 4 ठिकाणी बहुस्तरीय रोबोटिक पार्किंग टॉवर उभारण्यात येणार