“अमित ठाकरे बालिश, तो काहीही…” : महेश सावंत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे यंदा विधानसभा निवडणूक लढवत असल्यामुळे त्यांचीदेखील बरीच चर्चा होत आहे. अमित ठाकरेंमुळे मुंबईतील माहीम मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. अमित ठाकरेंसाठी स्वतः राज ठाकरे सभा घेत आहेत. तसेच राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, अमित यांच्या पत्नी मिताली व त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य जोरदार प्रचार करत आहेत. या प्रचारादम्यान, त्यांच्याकडून वेगवेगळ्या टिका-टिप्पण्या ऐकायला मिळत आहेत. तसेच अमित ठाकरेंचे विरोधक त्यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. माहीममधील शिवसेनेचे (ठाकरे) उमेदवार महेश सावंत यांनी अमित ठाकरेंवर टीका केली आहे. मनसेचे माहीमचे उमेदवार अमित ठाकरे यांनीही त्या वक्तव्याचा पुनरुच्चार केल्यानंतर त्यावर महेश सावंत म्हणाले, “मी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याइतका मोठा नेता नाही. मी एक सामान्य शिवसैनिक आहे. आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते व प्रवक्ते त्यावर बोलतील. तसेच अमित ठाकरेच्या वक्तव्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही. अमित ठाकरेला राजकारणातलं काही कळतं का? तो बालिश आहे. काहीही बोलू शकतो. त्याच्या प्रश्नांकडे व उत्तरांकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही. दरम्यान, अमित ठाकरे यांनी ते गेल्या 12 वर्षांपासून राजकारणात सक्रीय असल्याचं वक्तव्य काही दिवसांपू्वी केलं होतं. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी सावंत यांना त्या वक्तव्याची आठवण करून दिली असता ते म्हणाले, तो जन्म झाल्यापासून राजकारणात आहे. त्याचा जन्मच राजकारण्यांच्या घरात झाला आहे. अमित ठाकरेंना वक्तव्य करण्याचं स्वातंत्र्य आहे. सर्वांनाच ते स्वातंत्र्य आहे. जनता सुज्ञ आहे. कोणाला निवडायचं ते जनता ठरवेल.हेही वाचा विधानसभा निवडणूक : दक्षिण मुंबईतून करोडोची रोकड जप्तमहाराष्ट्र काँग्रेसकडून 16 बंडखोरांचे निलंबन
“अमित ठाकरे बालिश, तो काहीही…” : महेश सावंत


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे यंदा विधानसभा निवडणूक लढवत असल्यामुळे त्यांचीदेखील बरीच चर्चा होत आहे. अमित ठाकरेंमुळे मुंबईतील माहीम मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. अमित ठाकरेंसाठी स्वतः राज ठाकरे सभा घेत आहेत. तसेच राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, अमित यांच्या पत्नी मिताली व त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य जोरदार प्रचार करत आहेत. या प्रचारादम्यान, त्यांच्याकडून वेगवेगळ्या टिका-टिप्पण्या ऐकायला मिळत आहेत. तसेच अमित ठाकरेंचे विरोधक त्यांच्यावर टीका करताना दिसत आहेत.माहीममधील शिवसेनेचे (ठाकरे) उमेदवार महेश सावंत यांनी अमित ठाकरेंवर टीका केली आहे. मनसेचे माहीमचे उमेदवार अमित ठाकरे यांनीही त्या वक्तव्याचा पुनरुच्चार केल्यानंतर त्यावर महेश सावंत म्हणाले, “मी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याइतका मोठा नेता नाही. मी एक सामान्य शिवसैनिक आहे. आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते व प्रवक्ते त्यावर बोलतील. तसेच अमित ठाकरेच्या वक्तव्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही. अमित ठाकरेला राजकारणातलं काही कळतं का? तो बालिश आहे. काहीही बोलू शकतो. त्याच्या प्रश्नांकडे व उत्तरांकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही.दरम्यान, अमित ठाकरे यांनी ते गेल्या 12 वर्षांपासून राजकारणात सक्रीय असल्याचं वक्तव्य काही दिवसांपू्वी केलं होतं. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी सावंत यांना त्या वक्तव्याची आठवण करून दिली असता ते म्हणाले, तो जन्म झाल्यापासून राजकारणात आहे. त्याचा जन्मच राजकारण्यांच्या घरात झाला आहे. अमित ठाकरेंना वक्तव्य करण्याचं स्वातंत्र्य आहे. सर्वांनाच ते स्वातंत्र्य आहे. जनता सुज्ञ आहे. कोणाला निवडायचं ते जनता ठरवेल.हेही वाचाविधानसभा निवडणूक : दक्षिण मुंबईतून करोडोची रोकड जप्त
महाराष्ट्र काँग्रेसकडून 16 बंडखोरांचे निलंबन

Go to Source