केळशी येथे रविवारी ‘सागर मंथन’
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनानिमित्त आयोजन
पणजी : ‘पांचजन्य’ मासिकाचे संस्थापक संपादक, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी दरवर्षी देशात सुशासन दिन साजरा करण्यात येतो. त्याचे निमित्त साधून गोव्यात यंदा 24 डिसेंबर रोजी ‘सागर मंथन’ हा कार्यक्रम केळशी येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच काही केंद्रीय मंत्री आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळी हजेरी लावणार आहेत. सकाळी 10 ते सायंकाळी 5 असा हा दिवसभर कार्यक्रम असून तो गोवा दोना सिल्विका रिसॉर्ट-केळशी येथे होणार आहे. ‘सुशासन-राजकारण’ या संकल्पनेंतर्गत सदर कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यात भविष्यातील भारत, पर्यावरण, कल्याणकारी योजना अशा असाव्यात, त्याचे नियोजन कसे करता येईल या अनुषंगाने विविध विषयांवरील चर्चासत्रे होणार आहेत. ‘पांचजन्य’ हे एक साप्ताहिक असून वाजपेयी हे त्याचे संस्थापक संपादक होते. त्या साप्ताहिकाच्यावतीने या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, नितीन गडकरी, स्मृती इराणी, अनुरागसिंग ठाकुर व इतर काही केंद्रीय नेते मंडळी या ‘सागरमंथन’साठी येणार आहेत. गोव्यातील मान्यवरांना देखील त्याकरीता पाचारण करण्यात येणार असून लोकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन ‘पांचजन्य’तर्फे करण्यात आले आहे. नाताळच्या पूर्वदिनी हा कार्यक्रम होणार असल्याने त्यास मोठा प्रतिसाद मिळणार, अशी खात्री आयोजकांनी वर्तवली आहे.
Home महत्वाची बातमी केळशी येथे रविवारी ‘सागर मंथन’
केळशी येथे रविवारी ‘सागर मंथन’
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनानिमित्त आयोजन पणजी : ‘पांचजन्य’ मासिकाचे संस्थापक संपादक, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी दरवर्षी देशात सुशासन दिन साजरा करण्यात येतो. त्याचे निमित्त साधून गोव्यात यंदा 24 डिसेंबर रोजी ‘सागर मंथन’ हा कार्यक्रम केळशी येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच काही केंद्रीय मंत्री आणि विविध […]