सावंतवाडी मतदारसंघात विधानसभेसाठी ठाकरे शिवसेनेचा उमेदवार द्यावा

सावंतवाडी मतदारसंघात विधानसभेसाठी ठाकरे शिवसेनेचा उमेदवार द्यावा

रुपेश राऊळ करणार उद्धव ठाकरेंकडे मागणी
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा महाविकास आघाडी तर्फे उमेदवार द्यावा अशी मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यापूर्वी या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार निवडून आला होता . त्यामुळे मतदारसंघावर आमचा दावा आहे . मात्र महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना घारे-परब यांना उमेदवारी मिळाल्यास आणि त्यांच्या प्रचाराचा आदेश आल्यास आम्ही त्यांचे काम करू असे रुपेश राऊळ सांगितले विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आढावा घेण्यात येऊन त्याबाबत आत्मपरीक्षण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले यावेळी तालुका संघटक मायकल डिसोझा, विनोद राऊळ, आबा केरकर उपस्थित होते.