RR vs RCB : आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना, प्लेइंग 11 जाणून घ्या

खराब फॉर्मशी झुंजत असलेले रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) आणि चमकदार कामगिरी करणाऱ्या राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांना शनिवारी होणाऱ्या आयपीएल सामन्यात आपल्या आघाडीच्या फळीकडून चांगल्या कामगिरीची आशा असेल.

RR vs RCB : आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना, प्लेइंग 11 जाणून घ्या

खराब फॉर्मशी झुंजत असलेले रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) आणि चमकदार कामगिरी करणाऱ्या राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांना शनिवारी होणाऱ्या आयपीएल सामन्यात आपल्या आघाडीच्या फळीकडून चांगल्या कामगिरीची आशा असेल. आरसीबीकडे कर्णधार फाफ डुप्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन आणि रजत पाटीदार यांसारखे उत्कृष्ट आक्रमक फलंदाज आहे.

 

सवाई मानसिंग स्टेडियमची खेळपट्टी आरसीबीच्या होम ग्राउंड चिन्नास्वामी स्टेडियमसारखीच आहे ज्यावर फलंदाजांना फटके खेळणे सोपे जाईल. दुसरीकडे, रॉयल्सचे सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर चांगल्या फॉर्ममध्ये नाहीत. 

रॉयल्सच्या फलंदाजीची धुरा कर्णधार संजू सॅमसन (109 धावा) आणि रायन पराग (181 धावा) यांच्याकडे आहे.

 

दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग 11

राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रायन पराग, रविचंद्रन अश्विन, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, ट्रेंट बोल्ट, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल, आवेश खान.

 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, कॅमेरून ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज, यश दयाल, मयंक डागर, रीस टोपले.

 
Edited by – Priya Dixit 

 

Go to Source