रोहित शर्मा-विराट कोहली इतक्या वर्षांनंतर दुलीप ट्रॉफी खेळणार

भारतीय क्रिकेटचे दोन स्टार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी T20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद जिंकल्यावर निवृत्तीची घोषणा केली.

रोहित शर्मा-विराट कोहली इतक्या वर्षांनंतर दुलीप ट्रॉफी खेळणार

भारतीय क्रिकेटचे दोन स्टार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी T20  विश्वचषक 2024 चे विजेतेपद जिंकल्यावर निवृत्तीची घोषणा केली. 

हे दोन्ही खेळाडू भारताच्या घरगुती स्पर्धा दुलीप ट्रॉफी मध्ये खेळताना दिसणार अश्या बातम्या येत होत्या मात्र अंतिम निर्णय बीसीसीआयने या दोन्ही खेळाडूंवर सोडला आहे. 

हिटमॅन रोहित शर्माने दुलीप ट्रॉफी सामना इंडिया ब्लू  कडून 2016 मध्ये इंडिया रेड विरुद्ध खेळला होता. त्यात पहिल्या डावात त्यांनी 30 आणि दुसऱ्या डावात त्यांनी 75 धावा केल्या. संघाने कर्णधार गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली 355 धावानी विजय मिळवला.  

तर विराट कोहली 2010 मध्ये दुलीप ट्रॉफी खेळले नंतर त्यांनी उत्तर विभागाकडून खेळले आणि विभागाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. 

येत्या काही महिन्यांत टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध दोन कसोटी सामने, न्यूजीलँड विरुद्ध तीन कसोटी सामने आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाच कसोटी सामने खेळणार आहे. 

 Edited by – Priya Dixit   

Go to Source