नवीन काँक्रीट रस्त्यांची चाचणी होणार

नवीन काँक्रीट रस्त्यांची चाचणी होणार

महापालिकेने (BMC) जानेवारी 2023 मध्ये 324 किमीच्या डांबरी रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू केले होते. त्यापैकी 29.37 किमीचे काँक्रिटीकरण आत्तापर्यंत पूर्ण झाले आहे.महापालिकेने  (BMC) आयआयटी बॉम्बे (IIT Bombay)च्या सहाय्याने सर्व नवीन काँक्रीट रस्त्यांची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने जानेवारी 2023 मध्ये 324 किमीच्या डांबरी रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू केले होते. त्यापैकी 29.37 किमीचे काँक्रिटीकरण आत्तापर्यंत पूर्ण झाले आहे.महापालिकेने (BMC) या रस्त्यांची चाचणी (Core Test) घेण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत, महापालिकेने सोमवारी अंधेरी पूर्वेतील मांजरेकर वाडी आणि विलेपार्ले येथील दिक्षीत मार्गाच्या चाचण्या पूर्ण केल्या. हे नमुने आयआयटी बॉम्बे लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ही चाचणी टिकाऊपणा, एकसंधता आणि भार सहन करण्याची क्षमता यावर आधारित आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, “कोअर टेस्टिंग मशिन वापरून सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचा एक भाग पाडला जातो. काँक्रीटच्या भागाची ताकद तपासण्यासाठी हा नमुना आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) प्रयोगशाळेत पाठवला जातो. जर अपेक्षेनुसार रस्ता तयार केला नाही तर आम्ही कंत्राटदाराला रस्ता पुन्हा दुरुस्त करण्यास सांगू शकतो.”या चाचणीमुळे रस्त्यांचा दर्जा राखला जाईल तसेच कंत्राटदारांवरही कामाचा दर्जा उत्तम करण्याचे बंधन असेल. निकृष्ट काम खपवून घेतले जाणार नाही असा संदेशही कंत्राटदारांपर्यंत पोहोचेल. अशा दर्जा तपासण्याच्या चाचण्या सर्व कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकतात,” असे अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर (Abhijeet Bangar) यांनी सांगितले.हेही वाचागोरेगाव : आरेतील नवीन रस्त्यांना दोन महिन्यांतच खड्डेआता चलनाचे पैसे बँक खात्यातून आपोआप कापले जाणार

Go to Source