Ratnagiri : कॉलेजचा कंटाळा म्हणून तरुणाची आत्महत्या
आयुष्य हे खूप सुंदर आहे त्याला जपून ठेवावं.असं म्हटलं जात पण अलीकडे नैराश्यात कुठलाही विचार न करता टोकाचं पाऊल घेतात. रत्नागिरीत देवूड पिंपळवाडी येथे कॉलेजला जायचा कंटाळा येतो म्हणून एका तरुणाने विषारी औषधचे प्राशन करून तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमर दीपक घाणेकर(18) असे या मयत तरुणाचे नाव आहे.
अमर हा इयत्ता 11 वी चा विद्यार्थी होता. तो जाकादेवी हायस्कुल मध्ये शिकत होता.कॉलेजला जायचा कंटाळा येतो म्हणून 21 ऑक्टोबर रोजी अमरने रागाच्या भरात येऊन विषारी औषधाचं प्राशन केलं. त्याला तातडीनं रत्नागिरीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल त्याची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला केईएम रुग्णालय मुंबईत हलविले.
नंतर त्याला पुन्हा 9 नोव्हेंबर रोजी रत्नागिरीच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.नंतर त्याला रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचाराधीन असताना त्याची प्राण ज्योत मालवली. त्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस ठाण्यात त्याच्या मृत्यूची नोंद केली असून रत्नागिरी पोलीस अधिक तपास करत आहे.
Edited by – Priya Dixit