चॉकलेट मलाई रोल ही रक्षाबंधनासाठीएक अत्यंत सोपी, चविष्ट आणि आकर्षक मिठाई आहे.
साहित्य-
कोणतेही साधे बिस्किट-१५ ते २० (बारीक पावडर)
कोको पावडर-२ मोठे चमचे
पिठीसाखर-४ मोठे चमचे
दूध / दुधाची साय-४ ते ५ मोठे चमचे (गरजेनुसार)
डेसिकेटेड कोकोनट (खोबऱ्याचा खिस)-१ कप
मिलक पावडर-२ मोठे चमचे (पर्यायी)
बदाम-पिस्ता काप- २ चमचे (सजावटीसाठी)
ALSO READ: रक्षाबंधनाला भावासाठी बनवा मावा अनारसा; तोंडात पडताच विरघळेल, चव लागेल भारी!
कृती-
१. बाहेरील चॉकलेट थर :
एका बाऊलमध्ये बिस्किट पावडर, २ चमचे कोको पावडर आणि २ चमचे पिठीसाखर एकत्र करा. त्यात थोडे-थोडे दूध घालून चपातीच्या पिठासारखा मऊ गोळा मळून बाजूला ठेवा.
२. आतील मलाई स्टफिंग :
दुसऱ्या बाऊलमध्ये नारळाचा खिस, उरलेली २ चमचे पिठीसाखर आणि मिल्क पावडर एकत्र करा. १-२ चमचे दूध किंवा साय घालून त्याचाही एक घट्ट गोळा तयार करा.
३. रोल तयार करणे:
एका बटर पेपरवर किंवा प्लॅस्टिकच्या कागदावर थोडे तूप लावा. त्यावर चॉकलेटचा गोळा ठेवून लाटण्याने आयताकार लाटून घ्या.
४. स्टफिंग भरणे व गुंडाळणे:
या लाटलेल्या चॉकलेट थरावर मलाई/नारळाचे मिश्रण सर्वत्र व्यवस्थित पसरवा. आता बटर पेपरच्या मदतीने त्याचा घट्ट रोल गुंडाळत जा.
५. सेट करणे व कापणी:
हा रोल १० ते १५ मिनिटांसाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा. रोल कडक झाल्यावर बाहेर काढून सुरीने गोल चकत्यांच्या आकारात कापून घ्या. वरून बदाम-पिस्त्याचे काप लावून सर्व्ह करा!
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Sweet mixture recipe घरच्या घरी बनवा अगदी बाजारासारखे गोड फरसाण
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: रक्षाबंधन विशेष पारंपरिक मिठाईला द्या मॉडर्न टच! भावासाठी बनवा या ट्रेंडी स्वीट डिशेस