राजमा-मटार टिक्की रेसिपी
साहित्य-
उकडलेला राजमा – एक कप
उकडलेले मटार – एक कप
बारीक चिरलेले गाजर – एक कप
उकडलेला बटाटा – एक
बारीक चिरलेला कांदा – एक
आले – एक टीस्पून
हिरव्या मिरच्या – दोन
भाजलेले बेसन – दोन चमचे
चवीनुसार मीठ
चाट मसाला – अर्धा टीस्पून
गरम मसाला – अर्धा टीस्पून
काळी मिरी पूड – अर्धा टीस्पून
कोथिंबीर –
ALSO READ: Sweet Recipe : खजूर बर्फी
कृती-
सर्वात आधी गाजर आणि उकडलेले बटाटे सोलून घेऊन किसून घ्यावे. आता एका मोठ्या बाऊलमध्ये राजमा घेऊन त्यामध्ये मटार घालून एकत्र करावे. यानंतर त्यात कांदा, बटाटा, गाजर, बेसन घालावे आणि चांगले मिक्स करा. यानंतर मसाले आणि मीठ घाला चांगले मिसळा. तसेच कोथिंबीर घालावी. आता तयार मिश्रणाचे छोटे गोळे बनवा आणि नंतर हाताच्या मदतीने ते थोडेसे सपाट करा. ज्यामुळे त्याला टिक्कीचा आकार मिळेल. यानंतर, तव्यावर तूप टाकून सर्व टिक्की तव्यावर तळून घ्या. आता तयार टिक्कीवर कोथिंबीर गार्निश करावी. तर चला तयार आहे आपली राजमा टिक्की रेसिपी, हिरवी चटणी, सॉस सोबत नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik