मनसे पुणे, मुंबई, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व जागांवर निवडणूक लढवण्याची राज ठाकरे यांची घोषणा

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका वर्षाच्या अखेरीस होणार असून सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. बैठका सुरु आहे.जागा वाटपांसाठी चर्चा सुरु आहे

मनसे पुणे, मुंबई, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व जागांवर निवडणूक लढवण्याची राज ठाकरे यांची घोषणा

facebook

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका वर्षाच्या अखेरीस होणार असून सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. बैठका सुरु आहे.जागा वाटपांसाठी चर्चा सुरु आहे.

मनसेने देखील बुधवारी विधानसभा निवडणुकांसाठी बैठक घेतली या बैठकीत राज ठाकरे यांनी  पुणे, मुंबई, नाशिक,ठाणे या जिल्ह्यांच्या सर्व विधानसभांच्या जागांवर लढवण्याचा निर्णय घेतला असून तशी घोषणा केली आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना तयारी करण्याचे आदेश दिले आहे. अधिकाऱ्यांना या चारही जिल्ह्यांकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले आहे. तसेच त्यांनी कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही तर निवडणुका एकट्याने लढवणार असल्याचे संगितले.  

महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही पक्षांविरोधात जनतेत नाराजी असल्याचे मनसेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.त्यामुळेच चार जिल्ह्यांकडे विशेष लक्ष देत असल्याचे मनसेने सांगितले

Edited by – Priya Dixit 

 

Go to Source