लोकसभा मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर

पणजी : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात होणार असलेल्या 7 मे या मतदानाच्या दिवशी राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. तशी अधिसूचना सरकारने काढली आहे. ही सुट्टी सर्वांसाठी भरपगारी असून ती सर्व नोंदणीकृत मतदारांना लागू आहे. औद्योगिक कामगार, सरकारी खात्यातील हंगामी कर्मचारी, कामगार, खासगी क्षेत्रातील कर्मचारी, रोजंदारीवरील कामगार अशा सर्वांना ती सुट्टी देणे सर्वांवर बंधनकारक आहे. […]

लोकसभा मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर

पणजी : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात होणार असलेल्या 7 मे या मतदानाच्या दिवशी राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. तशी अधिसूचना सरकारने काढली आहे. ही सुट्टी सर्वांसाठी भरपगारी असून ती सर्व नोंदणीकृत मतदारांना लागू आहे. औद्योगिक कामगार, सरकारी खात्यातील हंगामी कर्मचारी, कामगार, खासगी क्षेत्रातील कर्मचारी, रोजंदारीवरील कामगार अशा सर्वांना ती सुट्टी देणे सर्वांवर बंधनकारक आहे. मतदारांना मते देण्यासाठी पुरेशी वेळ मिळावी म्हणून ही सुट्टी जाहीर करण्यात आली असून मतदानाचा दिवस हा मंगळवार आहे. सर्वसाधारण प्रशासन खात्याने सदर सुट्टीची अधिसूचना जारी केली आहे.