अंधेरीत मेट्रोच्या कामामुळे 24 फुटांचा खड्डा

अंधेरी परिसरातील सहार रोडवर सुरू असलेल्या मेट्रोच्या बोगद्याच्या कामादरम्यान (Mumbai Metro 7A) पी अँड टी कॉलनीतील रस्त्यावर तब्बल 24 फूट खोल खड्डा तयार झाला. भल्यामोठ्या खड्ड्यामुळे परिसरातील इमारतींना धोका निर्माण झाला. त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खबरदारीचा उपाय म्हणून MMRCLने तेथील नागरिकांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हलवले. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून अंधेरी पूर्व गुंदवली मेट्रोस्थानात ते सहार विमानतळ दरम्यान मेट्रो   7A मार्गाचे विस्तारीकरण सुरू करण्याचे काम आहे. यातील काही भाग हा भुयारी मार्गाने जोडला जाणार आहे.  अंधेरी पूर्वेकडील सहार पी एन टी कॉलनी परिसरात टनेलिंगचे काम सुरू आहे. सहार पीएनटी कॉलनी येथे जमिनीखाली मोठ्या यंत्राच्या साह्याने टनेलिंगचे काम सुरू असताना अचानक जमिनीला मोठे भगदाड पडले. या भगदाडाचा व्यास तीन मीटर इतका तर खोली साधारणपणे आठ मीटर पेक्षाही अधिक होती. या ठिकाणी पीएनटी कॉलनीत राहणारे पोस्ट कर्मचारी आणि बीएसएनएल कर्मचारी यांचे वास्तव्य आहे. रात्रीचे जेवण झाल्यानंतर या ठिकाणी लहान मुले आणि काही महिला शतपावली करत असताना हा खड्डा पडला. यामुळे कॉलनीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मुळात हे काम करत असताना इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे अपेक्षित होते. मात्र असा कुठलाही प्रकार प्रशासनाकडून करण्यात आलेला नाही. बेस्ट किंवा बीएसएनएल प्रशासनाकडून परवानगी न घेताच काम सुरू केलं का? अशी शंका देखील रहिवाशांकडून व्यक्त केली आहे. असा प्रकार त्या झोपडपट्टी परिसरात झाला तर मात्र मोठी हानी होऊ शकते, असा अंदाज देखील त्या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांकडून व्यक्त केला आहे.हेही वाचा मुंबई लोकल ट्रेनमध्ये विनयभंगाच्या वाढत्या घटना चिंताजनकपश्चिम रेल्वेवर तब्बल 35 दिवसांचा ब्लॉक

अंधेरीत मेट्रोच्या कामामुळे 24 फुटांचा खड्डा

अंधेरी परिसरातील सहार रोडवर सुरू असलेल्या मेट्रोच्या बोगद्याच्या कामादरम्यान (Mumbai Metro 7A) पी अँड टी कॉलनीतील रस्त्यावर तब्बल 24 फूट खोल खड्डा तयार झाला. भल्यामोठ्या खड्ड्यामुळे परिसरातील इमारतींना धोका निर्माण झाला. त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खबरदारीचा उपाय म्हणून MMRCLने तेथील नागरिकांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हलवले.मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून अंधेरी पूर्व गुंदवली मेट्रोस्थानात ते सहार विमानतळ दरम्यान मेट्रो   7A मार्गाचे विस्तारीकरण सुरू करण्याचे काम आहे. यातील काही भाग हा भुयारी मार्गाने जोडला जाणार आहे. अंधेरी पूर्वेकडील सहार पी एन टी कॉलनी परिसरात टनेलिंगचे काम सुरू आहे. सहार पीएनटी कॉलनी येथे जमिनीखाली मोठ्या यंत्राच्या साह्याने टनेलिंगचे काम सुरू असताना अचानक जमिनीला मोठे भगदाड पडले. या भगदाडाचा व्यास तीन मीटर इतका तर खोली साधारणपणे आठ मीटर पेक्षाही अधिक होती. या ठिकाणी पीएनटी कॉलनीत राहणारे पोस्ट कर्मचारी आणि बीएसएनएल कर्मचारी यांचे वास्तव्य आहे. रात्रीचे जेवण झाल्यानंतर या ठिकाणी लहान मुले आणि काही महिला शतपावली करत असताना हा खड्डा पडला. यामुळे कॉलनीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.मुळात हे काम करत असताना इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे अपेक्षित होते. मात्र असा कुठलाही प्रकार प्रशासनाकडून करण्यात आलेला नाही. बेस्ट किंवा बीएसएनएल प्रशासनाकडून परवानगी न घेताच काम सुरू केलं का? अशी शंका देखील रहिवाशांकडून व्यक्त केली आहे. असा प्रकार त्या झोपडपट्टी परिसरात झाला तर मात्र मोठी हानी होऊ शकते, असा अंदाज देखील त्या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांकडून व्यक्त केला आहे.हेही वाचामुंबई लोकल ट्रेनमध्ये विनयभंगाच्या वाढत्या घटना चिंताजनक
पश्चिम रेल्वेवर तब्बल 35 दिवसांचा ब्लॉक

Go to Source