निवडणूक कार्यालय परिसरात जमावबंदीचा आदेश लागू

बेळगाव-चिकोडी येथील कार्यालयांचा समावेश बेळगाव : बेळगाव व चिकोडी लोकसभा निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालय परिसरात जमावबंदी आदेश जारी करण्यात आला आहे. दि. 6 जून 2024 च्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत जमावबंदी असणार आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितेश पाटील यांनी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. दि. 12 ते 19 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. […]

निवडणूक कार्यालय परिसरात जमावबंदीचा आदेश लागू

बेळगाव-चिकोडी येथील कार्यालयांचा समावेश
बेळगाव : बेळगाव व चिकोडी लोकसभा निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालय परिसरात जमावबंदी आदेश जारी करण्यात आला आहे. दि. 6 जून 2024 च्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत जमावबंदी असणार आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितेश पाटील यांनी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. दि. 12 ते 19 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. त्याकाळात कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच अप्रिय घटना घडू नयेत, यासाठी चिकोडी लोकसभा निवडणूक अधिकाऱ्यांचे कार्यालय (तालुका प्रशासन इमारत चिकोडी) व बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयापासून शंभर मीटर अंतरापर्यंत सीआरपीसी कलम 144 अन्वये जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयापासून शंभर मीटरच्या अंतरात उमेदवार व त्यांच्या समर्थकांच्या तीनहून अधिक वाहनांना निर्बंध असणार आहेत. उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारासोबत केवळ चौघा जणांना मुभा असणार आहे. निवडणूक कार्यालयात जाण्यासाठी केवळ एक मार्ग सुरू ठेवून इतर मार्ग बंद केले जाणार आहेत. बंदोबस्तासाठी 24 तास पोलीस तैनात करण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली असून हा आदेश निवडणूक कामात असलेले अधिकारी, कर्मचारी व पोलिसांना लागू असणार नाही.