पूजाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
पूजा शर्माच कटकारस्थानाचा ‘मास्टर माईंड’
पणजी : आसगाव येथील आगरवाडेकर कुटुबांचे घर पाडण्याच्या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी असलेली पूजा शर्मा हीच कटकारस्थानाचा मास्टर माईंड असून तिलाच सर्वाधिक फायदा झाला असता. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने शर्माने पोलीस चौकशीला सामोरे जाणे आवश्यक आहे. पोलिसांनी पाठवलेल्या समन्सना ती जाणीवपूर्वक हजर राहिली नाही. शिवाय हे प्रकरण आणखी रेंगाळावे म्हणून जामिनसाठी अर्ज दाखल केला आहे. पूजाला जामीन मिळाल्यास ती साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता असल्याने तिचा अर्ज फेटाळण्यात आला असल्याचा निवाडा पणजी प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्या. इर्शाद आगा यांनी दिला आहे. न्या. इर्शाद आगा यांनी आपल्या 24 पानी निकालपत्रात या प्रकरणाची सर्व बाजू sऐकून घेऊन आपला निवाडा जाहीर केला आहे.
भरदुपारी पाडले आगरवाडेकरांचे घर
आसगाव येथील आल्ता वाड्यावरील सर्व्हे क्रमांक 135/1ए मधील 600 चौमी जमिनीत आगरवाडेकर कुटुंबीय राहत असलेल्या घराचा काही भाग 22 जून 2024 रोजी दुपारी पाडण्यात आला. त्यासाठी जेसीबी आणि बाउन्सरचा वापर करण्यात आला होता. याशिवाय आगरवाडेकर पिता-पुत्राचे अपहरणही करण्यात आले होते. गरीब गोमंतकीयावर घरात घुसून हुसकावून लावण्याचे हे प्रकरण राज्यभर गाजले, आणि त्याचे पडसाद राजकीय व सामाजिक क्षेत्रात तीव्रतेने उमटले होते. याप्रकरणी मुख्य संशयित आरोपी पूजा शर्मा ही अजूनही पोलिसांसमोर न येता तिने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केल्याने समस्त गोव्यासह देशभरातील प्रसारमाध्यमों न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष लागले होते.
समन्सच्या समन्सना पूजा गैरहजर
सुरुवातीला हणजूण पोलिसांनी 25 जून रोजी पूजा शर्मा हिला चौकशीला हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती. हे प्रकरण गुन्हा शाखेकडे वर्ग केल्यानंतर शर्मा हिला 28 जून रोजी समन्स बजावून 1 जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले होते. त्यावेळी शर्मा हिने आपण महाराष्ट्राच्या बाहेर अमृतसर आणि हिमाचल प्रदेशात असल्यामुळे हजर राहू शकणार नसल्याची माहिती दिली. तसेच जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात आपल्याला हजर राहण्यास तारीख देण्याची विनंती केली.
गुंडगिरीने बाहेर काढणे चुकीचेच
पूजा शर्मा हिने सदर जागा मूळ मालक पिंटो यांच्याकडून सुमारे 1.60 कोटी ऊपये देऊन खरेदी केली असल्याचा दावा केला असला तरी तेथील राहत्या घरातील लोकांना बेकायदेशीरपणे आणि गुंड प्रवृत्तीने बाहेर काढणे चुकीचे असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने काढला आहे.
कागदपत्रांवर आगरवाडेकरांचेच नाव
पिंटो यांनी दिलेल्या ‘ना हरकत’ प्रमाणपत्रामुळेच आसगाव येथील घरावरील हाऊस टॅक्स, वीज आणि पाणी बिलावर आगरवाडेकर यांचे नाव नोंदवण्यात आले आहे. या घरात आगरवाडेकर आपल्या कुटुंबासह वास्तव्य करत असून त्यांना बळजबरीने घराबाहेर काढण्याचा प्रयत्न झालेला आहे.
गंभीर गुन्हेगारीचे कारस्थान
शर्मा हिने आगरवाडेकर यांच्याविरोधात तक्रार केली असूनही तिचा फायदा न झाल्याने कायदा थेट हातात घेणे चुकीचे कृत्य केले आहे. सदर घटना घडली त्यावेळी शर्मा गोव्यात नसली तरी या घटनेने मुख्य फायदा तिलाच झाला असता हे सिद्ध होत आहे. सदर प्रकार हा गुन्हेगारी स्वरूपाचे कारस्थान असून मालमत्तेची हानी करून आतील लोकांना रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न हा गंभीर गुन्हा आहे. या प्रकरणी हणजूण पोलिसांनी मुख्य सूत्रधार पूजा शर्मा हिच्यासह रिअल इस्टेट एजन्ट अर्शद ख्वाजा आणि इतरांविरोधात 365, 427 व 34 या कलमांखाली गुन्हा नोंद केला. त्यानंतर हे प्रकरण गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आले. गुन्हा शाखेने याप्रकरणी आता भा.दं.सं.ची 440, 447, 448, 352, 354, 143, 147, 148 व 149 ही अतिरिक्त कलमे जोडली आहेत.
कायदा सर्वोच्च, त्याच्यापुढे कोणी नाही : अॅड. देसाई
पूजा शर्मा हिचा जामिन अर्ज फेटाळ्यात आल्याने आता पोलिसांपुढे शरणागत येणे अथवा उच्च न्यायालयात या आदेशाला आव्हान देणे हे दोनच मार्ग उपलब्ध आहेत. या विषयी पूजा शर्माचे वकिल अॅड. सुरेंद्र देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की आपण निकालाचा अभ्यास केल्यावरच भाष्य करू शकतो. पुढे काय निर्णय घ्यायचा पूजाकडे चर्चा करून ठरवले जाणार आहे. कायदा हा सर्वोच्च असून त्याच्यापुढे कोणी असू शकत नाही. पूजा शर्मा हिला अटक करण्याची गरज नाही. सध्या ती आपल्या घरी मुबंईला असण्याची शक्यता आहे.
पूजाचा गुन्हा माफ करण्याच्या योग्यतेचा नाही, कारण…
आगरवाडेकरधक्क्यातूनअजूनही सावरलेले नाही.
पूजालाजामीनदिल्यास हा धक्का आणखी वाढू शकतो.
पूजाशर्मानेकेलेला गुन्हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा आहे.
पूजासाक्षीदारांवरअजून दबाव आणण्याची भीती आहे.
यागुह्यालासात वर्षाहून अधिक काळाची शिक्षा आहे.
गुन्ह्याचेगंभीरस्वरूप पाहता तक्रार मागे घेता येत नाही.
तक्रारीतपूजाशर्माचे नाव स्पष्टपणे घेण्यात आलेले आहे.
पूजाच्यागुन्ह्dयामुळेजनतेच्या आत्मविश्वासाला तडा गेला.
पूजाशर्माचागुन्हा माफ करण्याच्या योग्यतेचा नाही.