Kolhapur : कुरुंदवाडमध्ये पोलिसांची धडक कारवाई; ८.८७ लाखांचा तंबाखू मुद्देमाल जप्त

                    शिरदवाड–इचलकरंजी मार्गावर कारवाई; लाखोंचा माल जप्त कुरुंदवाड : शिवनाकवाडी गावचे हद्दीत आयको मिलसमोरील रोडवर टेम्पोतून बेकायदा सुगंधी तंबाखू वेगवेगळ्या कंपन्यांचे सुगंधी मसाले सुपारी घेऊन जात असताना येथील पोलिसांनी छापा टाकून ८ लाख ८७ हजार ९६० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. […]

Kolhapur : कुरुंदवाडमध्ये पोलिसांची धडक कारवाई; ८.८७ लाखांचा तंबाखू मुद्देमाल जप्त

                    शिरदवाड–इचलकरंजी मार्गावर कारवाई; लाखोंचा माल जप्त

कुरुंदवाड : शिवनाकवाडी गावचे हद्दीत आयको मिलसमोरील रोडवर टेम्पोतून बेकायदा सुगंधी तंबाखू वेगवेगळ्या कंपन्यांचे सुगंधी मसाले सुपारी घेऊन जात असताना येथील पोलिसांनी छापा टाकून ८ लाख ८७ हजार ९६० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्याद पोलीस नाईक संतोष साबळे यांनी दिली.
आशिष पांडुरंग महावर (वय २६, रा. मंगळवारपेठ, रिंग रोड, इचलकरंजी ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) व पुष्कराज श्रीधर चाळके (वय २४, सध्या रा. रिंग रोड मंगळवारपेठ, इचलकरंजी ता. हातकणंगले, मुळ रा.लोणार गल्ली, कुरूंदवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान बोरगाव ते शिवनाकवाडी, शिरदवाड मार्ग ते इचलकरंजीकडे जाणाऱ्या रोडवर शिवनाकवाडी गावचे हद्दीत आयको मिलसमोरील रोडवर टेम्पोतून बेकायदा सुगंधी मसाला तंबाखूची वाहतूक करताना येथील पोलिसांनी छापा टाकून पोलिसांनी ८ लाख ८७, हजार ९६० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने करीत आहेत.