गडहिंग्लजमध्ये वेश्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा ! ५ जण अटकेत

गडहिंग्लजमध्ये वेश्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा ! ५ जण अटकेत

गडहिंग्लज : प्रतिनिधी

गडहिंग्लज शहरातील मध्यवस्तीत असणाऱ्या हुजरे गल्लीतील अथर्व बिल्डिंग येथे सुरू असणाऱ्या वेश्या अड्ड्यावर पोलिसांनी सोमवार रात्री छापा टाकून दोन महिलांसह पाच जणांना अटक केले आहे. या कारवाईने शहरात खळबळ उडाली असून सर्वत्र याची वेगाने चर्चा होत आहे.
शहरातील मध्यवस्तीत एका इमारतीत वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती सुरू असल्याची माहिती पोलीसाना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकला. यात दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. तर युवराज अरुण पोदार (रा. भैरापुर ता. हुकेरी) अनिकेत मारुती जाधव (रा. संकेश्वर) ओंकार कुमार पाथरवट (रा. हूजरे गल्ली गडहिंग्लज) यासीन फारूक नाईकवाडी, सोहेलखान महंमदअली पठाण (दोघे रा. दुंडगा मार्ग गडहिंग्लज) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडील मोबाईलसह अन्य साहित्य जप्त केले आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियमाखाली संबंधितावर कारवाई केली असून याची फिर्याद कॉन्स्टेबल संपदा कुट्रे यांनी नोंदवली आहे.