चौसष्ट योगिनी देवींची कृपा 

तुमच्या मुलांवर आणि संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो

त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो!

पिठोरी अमावस्येच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

 

पिठोरी अमावस्या दिन आनंदाचा,

आज मातृदिनाचे महत्त्व लेवू संस्कारांचा साज!

पिठोरी अमावस्या आणि मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!  

 

आई म्हणजे वात्सल्याचा ठेवा,

आई म्हणजे अमृताचा गोडवा…

आई म्हणजे पावसाचा ओलावा,

आई म्हणजे सुखाचा गारवा!

मातृदिनाच्या व पिठोरी अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!  

 

कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही…

पिठोरी अमावस्या व बैलपोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा!  

 

आई, आमची सर्वप्रथम गुरू, तुझ्यापासून आमचे अस्तित्व सुरू…

तुझ्या चेहऱ्यावरील हास्य हे असेच कायम राहू दे!

पिठोरी अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!  

 

न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे ‘आई’,

विधात्याच्या कृपेचं निर्भेळ वरदान म्हणजे ‘आई’!

पिठोरी अमावस्येच्या व मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!  

 

चौसष्ट योगिनींच्या कृपेने तुमच्या घरात 

सुख, समृद्धी आणि आरोग्याची नांदी राहो

पिठोरी अमावस्येच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

 

आई नसते केवळ काया, आई असते ओंजळभर माया…

सर्व मातांना आणि त्यांच्या परिवाराला पिठोरी अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!  

 

अंधारालाही दूर करणारा प्रकाश तू,

शेवटच्या क्षणापर्यंतचा कुशीतला विसावा तू…

मातृदिनाच्या आणि पिठोरी अमावस्येच्या शुभेच्छा!  

 

आईची माया अन् तिचा मायेचा स्पर्श,

तुमच्या आयुष्यात आणो अखंड आनंद अन् हर्ष!

पिठोरी अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!

 

आईच्या चरणी स्वर्ग सुखाचा,

तिच्या आशिर्वादाने उजळो मार्ग भविष्याचा…

मातृदिन आणि पिठोरी अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा!

 

कठीण काळातही पाठीशी उभी राहणाऱ्या 

सर्व मातांना मानाचा मुजरा!

पिठोरी अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!

 

श्रावणातील या पवित्र अमावस्येला 

तुमच्या घरातील सर्व दुःख, दारिद्र्य दूर होवो

आणि सुख-समृद्धीचा नवा प्रकाश येवो!

पिठोरी अमावस्येच्या भावपूर्ण शुभेच्छा!