श्री गुरुदेव दत्तपीठ देवगड

महाराष्ट्र ही संतांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली भूमी आहे. महाराष्ट्राला अनेक संतांच्या विचारांची अमूल्य देणगी लाभली आहे. तसेच महाराष्ट्रात अनेक पवित्र स्थान आहे. जिथे गेल्याने मनाला शांती लाभते. पवित्र ठिकाणी जीवनाला नवीन दिशा मिळते. मन भक्तिमय …

श्री गुरुदेव दत्तपीठ देवगड

महाराष्ट्र ही संतांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली भूमी आहे. महाराष्ट्राला अनेक संतांच्या विचारांची अमूल्य देणगी लाभली आहे. तसेच महाराष्ट्रात अनेक पवित्र स्थान आहे. जिथे गेल्याने मनाला शांती लाभते. पवित्र ठिकाणी जीवनाला नवीन दिशा मिळते. मन भक्तिमय होते. तसेच महाराष्ट्रातील एक परम पवित्र आणि सुंदर ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र देवगड. प्रवरा नदीच्या काठावर वसलेले व औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या मध्यावर असलेले श्री क्षेत्र देवगड हे श्री गुरुदेव दत्त यांना समर्पित आहे. तसेच श्री गुरुदेव दत्तपीठ देवगड या नावाने देखील ते ओळखले जाते. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा जवळ देवगड मध्ये श्री दत्तात्रय यांचे मंदिर आहे. प्रवरा नदीच्या किनारी वसलेले हे देवस्थान भक्तांची श्रद्धा, पवित्रता आणि धार्मिकतेचे एक केंद्र बिंदु आहे. 

 

इतिहास-

देवगड दत्त मंदिर एक पवित्र मंदिर आहे. जिथे ब्रह्मा, विष्णु आणि शिव या त्रिमूर्ति भगवान दत्तात्रेय यांना समर्पित आहे. या मंदिराची स्थापना महान संत आणि तपस्वी श्री किशनगिरी महाराज यांनी केली होती. ज्यांनी 12 वर्षांपर्यंत प्रवरा नदीच्या काठावर कठोर तपस्या केली होती. त्यांना भगवान दत्तात्रय यांनी  दिव्य दृष्टि ने आशीर्वाद दिला होता. तसेच लोकांच्या कल्याणासाठी मंदिर बनवण्याचा उपदेश दिला. संत  किसनगिरी बाबा यांचे जीवन भक्तांसाठी प्रेरणादायी आहे.

 

किशनगिरी महाराज यांनी 1983 मध्ये आपले नश्वर शरीर त्यागिले. तसेच त्यांची समाधी मंदिराच्या जवळच आहे. हे मंदिर मोठ्या क्षेत्रामध्ये पसरलेले आहे. इथे शांत आणि अध्यात्मिक वातावरण आहे. हे मंदिर भक्तांसाठी नेहमी खुले असते. तसेच मोफत भोजन आणि राहण्याची सुविधा प्रदान करते. मंदिरामध्ये एक सुंदर बगीचा, प्रवरा नदी वर नाव सुविधा व तसेच एक सुंदर शिव मंदिर देखील आहे. 

 

या “प्रवरा” नदीला अमृतवाहिनी देखील संबोधले जाते. प्रवरा नदी अगस्तीऋषी यांच्या तपोभूमीमधून उगम होऊन नेवासामध्ये व दक्षिणची गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी यांचा संगम देवगड मध्ये होतो. देवगड नैसर्गिक सौंदर्याने भरपूर एक अत्यंत सुंदर स्थान आहे. 

 

तसेच देवस्थानाजवळ बोटिंगला जाता येते. मंदिर परिसर प्रवरा नदीच्या काठावर वसलेला असून नदीवर बोटींगची सोय आहे. नदीवर बोटिंग करताना मंदिर आणि सभोवतालच्या निसर्गाच्या सुंदर दृश्यांचा आनंद घेता येतो. 

 

तसेच या मंदिराचे निर्माण भक्तांची श्रद्धा आणि प्रार्थना यासाठी करण्यात आले आहे. श्री क्षेत्र देवगड मंदिर हे अत्यंत स्वच्छ आणि सुविधांनी परिपूर्ण ठेवण्यात आले आहे. तसेच आपल्याला इथे पवित्र असलेले औदूंबराचे वृक्ष पाहावयास मिळतात. 

 

देवगड दत्त मंदिर संस्थान कडून दर्शनासाठी आलेल्या भक्तांसाठी मंदिरामध्ये प्रत्येकदिवशी भोजन प्रसादाची व्यवस्था असते. प्रसादामध्ये भात, डाळ, भाजी, पोळी, पापड आणि लाडू सहभागी आहे. याशिवाय  इथे दत्तांच्या मंदिरासमोर नारळ, फूल, मिठाई आणि फळ प्रसाद स्वरूपात दिले जाते. 

 

श्री गुरुदेव दत्तपीठ देवगड जावे कसे?

औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या मध्यावर व प्रवरा नदीच्या काठावर वसलेले श्री क्षेत्र देवगड हे अत्यंत पवित्र स्थान असून येथे पोहोचण्यासाठी राज्य महामार्ग सर्वात सोप्प मार्ग आहे. तसेच देवगडला जाण्यासाठी विविध मार्गांनी जाऊ शकतात. 

 

विमानसेवा- औरंगाबाद विमानतळ देवगड पासून 53 किमी अंतरावर आहे. तसेच पुणे विमानतळ देखील 180 किमी अंतरावर आहे. विमानतळावरून तुम्ही कॅप करून मंदिरापर्यंत सहज जाऊ शकतात. 

 

रस्ता मार्ग- औरंगाबाद ते पुणे महामार्गावर असलेला देवगड फाटा वरून 5 किमी अंतरावर देवगड आहे. बसने देखील जात येते. 

 

रेल्वेसेवा- औरंगाबाद, अहमदनगर, श्रीरामपूर व शिर्डी या ठिकाणी रेल्वे स्टेशन असून, या स्टेशनवरून कॅप किंवा खाजगी वाहन करून मंदिरापर्यंत सहज पोहचता येते.