पंचतंत्र : ब्राम्हण आणि सापाची गोष्ट

एका नगरीमध्ये हरिदत्त नावाचा एक ब्राम्हण राहायचा त्याच्या कडे अगदीच थोडे शेत होते. एकदा ग्रीष्म ऋतूमध्ये तो आपल्या शेतात एक वृक्षाच्या खाली झोपलेला होता. त्याने पहिले की, तो झोपलेला आहे त्या ठिकाणी एक सापाचे बीळ आहे. व तिथे साप फणा काढून बसलेला

पंचतंत्र : ब्राम्हण आणि सापाची गोष्ट

एका नगरीमध्ये हरिदत्त नावाचा एक ब्राम्हण राहायचा त्याच्या कडे अगदीच थोडे शेत होते. एकदा ग्रीष्म ऋतूमध्ये तो आपल्या शेतात एक वृक्षाच्या खाली झोपलेला होता. त्याने पहिले की, तो झोपलेला आहे त्या ठिकाणी एक सापाचे बीळ आहे. व तिथे साप फणा काढून बसलेला आहे. 

 

त्याला पाहून हरिदत्तने विचार केला की, कदाचित हाच माझ्या क्षेत्रातील देवता आहे. मी कधीही याची पूजा केली नाही. आता मी नक्कीच याची पूजा करेल. हा विचार करून हरिदत्त उठला आणि जाऊन दूध घेऊन आला. 

 

त्याने ते दूध सापाजवळ ठेवले आणि म्हणाला की, “हे क्षेत्रपाल! आज पर्यंत मला तुमच्याबद्दल माहित न्हवते. माझी पूजा स्वीकार करा आणि माझ्यावर कृपा करा. अश्या प्रकारे विनंती करून हरिदत्त आपल्या घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो आपल्या शेतावर आला. सर्वात आधी सापाच्या बिळाजवळ गेला. जिथे त्याने दूध ठेवले होते तिथे सोन्याचे नाणे दिसले. 

 

त्याने ते नाणे उचलले. तसेच त्या दिवशीही त्यांनी अशाच प्रकारे सापाची पूजा केली आणि त्यासाठी दूध ठेवून ते निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला पुन्हा त्याला सोन्याचे नाणे मिळाले. काही दिवसांनी त्याला काही कामानिमित्त दुसऱ्या गावी जावे लागले. त्याचा मुलाला त्या ठिकाणी दूध ठेवण्याची सूचना केली. त्यानुसार त्या दिवशी त्याचा मुलगा तेथे जाऊन दूध ठेऊन आला. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा दूध ठेवण्यासाठी गेला तेव्हा सोन्याचे नाणे ठेवलेले त्याला दिसले. त्याने ते नाणे उचलले आणि मनात विचार करू लागला की या बिळामध्ये नक्कीच सोन्याच्या नाण्यांचा साठा आहे. हा विचार त्याच्या मनात येताच त्याने बिळ खोदून सर्व नाणे काढून घेण्याचे ठरवले. तसेच सापाची भीती तर होती. पण साप दूध पिण्यासाठी बाहेर आल्यावर त्याने काठीने त्याच्या डोक्यावर प्रहार केला. त्यामुळे साप मरण पावला नाही आणि तो इतका क्रोधित झाला की त्याने ब्राह्मणाच्या मुलाला दंश केला. जयमाउळें त्याचा मृत्यू झाला.  

तात्पर्य : लोभ एक वाईट गोष्ट आहे. 

Edited By- Dhanashri Naik