नवरात्रोत्सव विशेष : उपवास थालीपीठ सोबत सर्व्ह करा पेरूची चटणी

साहित्य- 2 मध्यम आकाराचे कच्चे पेरू 2 हिरवी मिरची 1 चमचा जिरे 1 मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे किंवा काजू चवीनुसार सेंधव मीठ

नवरात्रोत्सव विशेष : उपवास थालीपीठ सोबत सर्व्ह करा पेरूची चटणी

साहित्य-

2 मध्यम आकाराचे कच्चे पेरू 

2 हिरवी मिरची 

1 चमचा जिरे 

1 मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे किंवा काजू 

चवीनुसार सेंधव मीठ 

आल्याचा छोटा तुकडा 

1 मोठा चमचा लिंबाचा रस 

कोथिंबीर चिरलेली 

आवश्यकतेनुसार पाणी  

 

कृती-  

सर्वात आधी कच्चे पेरू धुवून घेऊन त्यांचे तुकडे करून घ्यावे. आता मिक्सरमध्ये पेरूचे तुकडे, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे, भाजलेले शेंगदाणे आणि चिमूटभर मीठ घालून बारीक करून घ्यावे. आता या चटणीचा तिखटपणा कमी व्हावा म्हणून तुम्ही यामध्ये लिंबाचा रस टाकू शकतात किंवा साखर, गूळ देखील घालू शकतात. तर चला तयार आहे आपली उपवासाला चालणारी पेरूची चटणी, जी तुम्ही साबुदाणा वडा किंवा उपासाचे थालीपीठ यांसोबत सर्व्ह करू शकतात.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

 

Edited By- Dhanashri Naik