Nashik News | मनपातील पदोन्नती घोळ थेट विधीमंडळात

Nashik News | मनपातील पदोन्नती घोळ थेट विधीमंडळात

नाशिक महानगरपालिकेतील तत्कालिन प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांच्या कार्यकाळातील पदोन्नती घोटाळा आता थेट राज्य विधीमंडळात पोहोचला आहे. भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी वैद्यकीय विभागातील अनियमिततेकडे लक्ष वेधत, महापालिका प्रशासनावर जाब विचारला आहे. या वादामुळे वैद्यकीय अधीक्षकांना मुंबईत पाचारण करण्यात आले असून, महापालिकेतील रुग्णालयांचे परवाना नुतनीकरणही चर्चेत आले आहे.