चोरीच्या आरोपातून नात्यातील युवकाचा खून
सुतगट्टी येथील घटना : खांबाला बांधून मारहाण
बेळगाव : आपल्याच नातेवाईकांच्या घरात चोरी करणाऱ्या एका युवकाचा खून करण्यात आला आहे. रविवारी दुपारी सुतगट्टी, ता. बेळगाव येथे ही घटना घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. रात्री उशिरापर्यंत काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. रायाप्पा बसवाणी मण्णीकेरी (वय 30) रा. सुतगट्टी असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. त्यांच्याच भाऊबंदातील शेट्याप्पा कल्लाप्पा मण्णीकेरी याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात आले. शेट्याप्पावर एफआयआर दाखल करण्यात येत होता. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. बेळगाव ग्रामीणचे एसीपी गंगाधर बी. एम., काकतीचे पोलीस निरीक्षक उमेश एम., पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक रवी व•र, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पी. के. परसन्नवर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पंचनाम्याचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात हलविण्यात आला. उपलब्ध माहितीनुसार शेट्याप्पा मण्णीकेरी हा आपल्या घराला कुलूप लावून तीन दिवसांसाठी यात्रेसाठी बिरनोळी येथील नातेवाईकांच्या घरी गेला होता. रविवारी दुपारी तो घरी परतला, त्यावेळी त्याच्या घरात चोरी झाल्याचे उघडकीस आले. खून झालेला रायाप्पा मण्णीकेरी याला दारूचे व्यसन जडले होते. अधूनमधून तो गावात चोरी करत होता. मात्र, त्याच्यावर एकाही प्रकरणाची नोंद नाही. घरावरील कौले काढून घरातील किमती वस्तू पळविल्याचे लक्षात येताच शेट्याप्पा जाब विचारण्यासाठी रायाप्पाच्या घरी पोहोचला. ‘आम्ही सगळे नातेवाईकच आहोत. आमच्या घरी चोरी का केलीस?’ अशी शेट्याप्पाने विचारणा केली. चोरीची विचारणा करताच राग अनावर झालेल्या रायाप्पाने आक्रमक पवित्रा घेत हातात विळा घेतला. त्यामुळे त्याला मारहाण करून शेट्याप्पाने रायाप्पाला खांबाला बांधले. या घटनेत रायाप्पाचा मृत्यू झाला. काकती पोलीस पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी शेट्याप्पाला ताब्यात घेतल्याचे समजते.
Home महत्वाची बातमी चोरीच्या आरोपातून नात्यातील युवकाचा खून
चोरीच्या आरोपातून नात्यातील युवकाचा खून
सुतगट्टी येथील घटना : खांबाला बांधून मारहाण बेळगाव : आपल्याच नातेवाईकांच्या घरात चोरी करणाऱ्या एका युवकाचा खून करण्यात आला आहे. रविवारी दुपारी सुतगट्टी, ता. बेळगाव येथे ही घटना घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. रात्री उशिरापर्यंत काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. रायाप्पा बसवाणी मण्णीकेरी (वय 30) रा. सुतगट्टी […]