मनपाचा आज अर्थसंकल्प
घरपट्टी वाढविणार का? : सत्ताधारी गटाची कसरत
बेळगाव : महापालिकेचा अर्थसंकल्प मंगळवार दि. 27 फेब्रुवारी रोजी मांडला जाणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे शहरातील जनतेसह स्थानिक संस्थांचेही लक्ष लागून राहिले आहे. या अर्थसंकल्पामध्ये करांमध्ये किती वाढ केली जाणार? हे पहावे लागणार आहे. यावर्षी सरकारकडून येणारा निधी कमी झाला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्येच विकासकामांचेही नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपला अर्थसंकल्प मांडताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. महानगरपालिकेचा अर्थसंकल्प दरवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मांडण्यात येतो. मात्र, यावर्षी हा अर्थसंकल्प मांडण्यासाठी उशीर झाला आहे. विशेष म्हणजे अर्थसंकल्पापूर्वी किमान तीन आढावा बैठका घेतल्या जातात. मात्र, यावर्षी केवळ एकच आढावा बैठक घेतली आहे. त्यामध्ये विविध स्थानिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील समस्यांचा पाढा या बैठकीमध्ये वाचल्याने भाजपला अर्थसंकल्प मांडताना साऱ्या बाजू पडताळून पहाव्या लागणार आहेत.
अर्थ व कर स्थायी समितीची बैठक चार दिवसांपूर्वी झाली आहे.
त्या बैठकीमध्ये नेमके काय घडले आहे? हे सांगण्यात आले नाही. पत्रकारांनाही त्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मनाई करण्यात आली. त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये काही गौडबंगाल लपले आहे का? अशी शंका सामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे. विरोधी गटाच्या नगरसेवकांना विश्वासात न घेताच ही बैठक पार पाडण्यात आल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाकडे साऱ्यांच्याच नजरा लागल्या आहेत. मंगळवारी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात होणार आहे. अर्थ व कर स्थायी समितीच्या अध्यक्षा वीणा विजापुरे या अर्थसंकल्प मांडणार आहेत.
Home महत्वाची बातमी मनपाचा आज अर्थसंकल्प
मनपाचा आज अर्थसंकल्प
घरपट्टी वाढविणार का? : सत्ताधारी गटाची कसरत बेळगाव : महापालिकेचा अर्थसंकल्प मंगळवार दि. 27 फेब्रुवारी रोजी मांडला जाणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे शहरातील जनतेसह स्थानिक संस्थांचेही लक्ष लागून राहिले आहे. या अर्थसंकल्पामध्ये करांमध्ये किती वाढ केली जाणार? हे पहावे लागणार आहे. यावर्षी सरकारकडून येणारा निधी कमी झाला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्येच विकासकामांचेही नियोजन करावे लागणार […]