नवीन वर्षात घर खरेदीला सुगीचे दिवस
नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात मुंबईत दरवर्षीच्या तुलनेत यंदा चांगली खरेदी झाली आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात घर खरेदीला सुगीचे दिवस आले आहेत. मुंबई शहरात जानेवारी महिन्यात 13 वर्षातील सर्वाधिक मालमत्ता नोंदणी झाली आहे. मात्र गत वर्षीच्या डिसेंबर महिन्याच्या तुलनेत जानेवारी 2025 मध्ये घर खरेदीत तब्बल 5 टक्के घट झाली आहे.मालमत्ता सल्लागार नाइट फ्रँक इंडियाच्या अहवालानुसार जानेवारी 2025 मध्ये मुंबईत अंदाजे 11 हजार 773 मालमत्ता नोंदणी झाली. गेल्या 13 वर्षातील जानेवारीतील ही 7 टक्के वाढ आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या घर खरेदीमुळे मुद्रांक शुल्क संकलनात 952 कोटींहून अधिक उत्पन्न मिळाले. मात्र महिन्या-दरमहिना (मासिक) आधारावर मालमत्ता नोंदणींमध्ये 5 टक्केंची किंचित घट झाली आहे. तर डिसेंबर 2024 च्या तुलनेत महसूल संकलनात 16 टक्के घट झाली.या अहवालानुसार ग्राहकांनी प्रीमियम रिअल इस्टेटला मोठी पसंती दर्शविली आहे. जानेवारी 2024 मध्ये 2 कोटी आणि त्याहून अधिक किमतीच्या मालमत्तांच्या नोंदणीचा वाटा 16 टक्के होता. तो जानेवारी 2025 मध्ये 19 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.जानेवारी 2025 मध्ये या विभागात 2 हजार 298 व्यवहार झाले. जे लक्झरी घरांसाठी चांगली मागणी दर्शवितात. तर याच कालावधीत 50 लाखांपेक्षा कमी किमतीच्या मालमत्तांच्या नोंदणीचा वाटा 31 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. त्यामुळे उच्च किमतीच्या मालमत्तांकडे खरेदीदारांच्या पसंतींमध्ये बदल झाल्याचे दर्शवित आहे.घर खरेदीत मुंबईच्या पश्चिम आणि मध्य उपनगरांनी वर्चस्व कायम ठेवले आहे. शहराच्या एकूण मालमत्ता नोंदणींमध्ये 86 टक्के योगदान दिले. मात्र मध्य उपनगरांतील बाजारपेठेमधील वाटा 29 टक्क्यांवरून 33 टक्क्यापर्यंत वाढला आहे. तर पश्चिम उपनगरांचा वाटा 57 टक्क्यांवरून 53 टक्क्यापर्यंत घसरला आहे.हेही वाचामुंबई : प्रदूषण रोखण्यासाठी पालिका आधुनिक मशीन खरेदी करणार
लक्ष द्या! मुंबईतल्या ‘या’ भागात 30 तास पाणी पुरवठा बंद
Home महत्वाची बातमी नवीन वर्षात घर खरेदीला सुगीचे दिवस
नवीन वर्षात घर खरेदीला सुगीचे दिवस
नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात मुंबईत दरवर्षीच्या तुलनेत यंदा चांगली खरेदी झाली आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात घर खरेदीला सुगीचे दिवस आले आहेत. मुंबई शहरात जानेवारी महिन्यात 13 वर्षातील सर्वाधिक मालमत्ता नोंदणी झाली आहे. मात्र गत वर्षीच्या डिसेंबर महिन्याच्या तुलनेत जानेवारी 2025 मध्ये घर खरेदीत तब्बल 5 टक्के घट झाली आहे.
मालमत्ता सल्लागार नाइट फ्रँक इंडियाच्या अहवालानुसार जानेवारी 2025 मध्ये मुंबईत अंदाजे 11 हजार 773 मालमत्ता नोंदणी झाली.
गेल्या 13 वर्षातील जानेवारीतील ही 7 टक्के वाढ आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या घर खरेदीमुळे मुद्रांक शुल्क संकलनात 952 कोटींहून अधिक उत्पन्न मिळाले. मात्र महिन्या-दरमहिना (मासिक) आधारावर मालमत्ता नोंदणींमध्ये 5 टक्केंची किंचित घट झाली आहे. तर डिसेंबर 2024 च्या तुलनेत महसूल संकलनात 16 टक्के घट झाली.
या अहवालानुसार ग्राहकांनी प्रीमियम रिअल इस्टेटला मोठी पसंती दर्शविली आहे. जानेवारी 2024 मध्ये 2 कोटी आणि त्याहून अधिक किमतीच्या मालमत्तांच्या नोंदणीचा वाटा 16 टक्के होता. तो जानेवारी 2025 मध्ये 19 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
जानेवारी 2025 मध्ये या विभागात 2 हजार 298 व्यवहार झाले. जे लक्झरी घरांसाठी चांगली मागणी दर्शवितात. तर याच कालावधीत 50 लाखांपेक्षा कमी किमतीच्या मालमत्तांच्या नोंदणीचा वाटा 31 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. त्यामुळे उच्च किमतीच्या मालमत्तांकडे खरेदीदारांच्या पसंतींमध्ये बदल झाल्याचे दर्शवित आहे.
घर खरेदीत मुंबईच्या पश्चिम आणि मध्य उपनगरांनी वर्चस्व कायम ठेवले आहे. शहराच्या एकूण मालमत्ता नोंदणींमध्ये 86 टक्के योगदान दिले. मात्र मध्य उपनगरांतील बाजारपेठेमधील वाटा 29 टक्क्यांवरून 33 टक्क्यापर्यंत वाढला आहे. तर पश्चिम उपनगरांचा वाटा 57 टक्क्यांवरून 53 टक्क्यापर्यंत घसरला आहे.हेही वाचा
मुंबई : प्रदूषण रोखण्यासाठी पालिका आधुनिक मशीन खरेदी करणारलक्ष द्या! मुंबईतल्या ‘या’ भागात 30 तास पाणी पुरवठा बंद