मुंबई (Mumbai) ठाणे (Thane) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील फलाटांच्या रुंदीकरण्यासाठी तीन दिवस घेण्यात आलेला जंम्बो मेगा ब्लॉकला (Mega Block) प्रवासी संघटनांनी विरोध केला आहे. प्रवाशांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका म्हणत या विरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. तीन दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्याआधी प्रवासी संघटनांशी चर्चा करायला हवी होती. तसेच हा निर्णय घेण्यापूर्वी वाहतुकीचे पर्याय उपलब्ध करून द्यायला हवे होते अशी मागणी देखील संघटनांनी केले आहे. तीन दिवसांच्या ब्लॉकमध्ये, तब्बल 930 लोकल फेऱ्या रद्द झाल्याने याचा फटका लाखो मुंबईकरांना बसणार असल्याने हा निर्णय मागे घेण्यात यावा अशी देखली मागणी करण्यात आली आहे.मुंबई ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाटांच्या रुंदीकरण्यासाठी तीन दिवस मेगा ब्लॉक घोषित करत 930 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल होणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे रस्ते वाहतुकीवर ताण येणार आहे. त्यामुळे या काळात शासकीय, निमशासकीय कार्यालये व खासगी कंपन्यांतील नोकरदार वर्गाला ‘सुट्टी’ किंवा ‘वर्क फ्रॉम होम’ द्यावे अशी मागणी प्रवासी संघटनांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. या मेगा ब्लॉक बद्दल पुर्व कल्पना देणे गरजेचे असतांना रेल्वेने तसे केले नाही. यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. या निर्णयाचा नागरिकांना प्रवासादरम्यान त्रास होणार असून गर्दीत किंवा प्रवास करतांना चेंगराचेंगरी झाल्यास याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेच्या या भोंगळ कारभाराविरोधात तसेच ब्लॉक मागे घेण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आंदोलन केले. या मेगा ब्लॉक बद्दल 3 आठवडाभरपूर्वी माहिती देणे गरजेचे होते. मात्र, एक दिवस आधी माहिती दिल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे. तसेच रस्ते वाहतुकीवर देखील याचा ताण येणार आहे.
शनिवारी ५३४ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून याचा परिमाण मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर होणार आहे. या प्रवाशांची उद्या चांगलीच तारांबळ उडणार आहे. ब्लॉकमुळे शेकडो रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. सीएसएमटीपर्यंत येणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या दादर, ठाणे, पनवेल, नाशिक व पुण्यापर्यंत चालविण्यात येतील. तर सीएसएमटीवरून सुटणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या दादर, पनवेल, नाशिक स्थानकातून सोडण्यात येणार आहेत.हेही वाचा31 मे ते 2 जून दरम्यान सेंट्रल रेल्वेवरील ‘या’ ट्रेन्स रद्द
डोंबिवली : घरडा सर्कल रस्ता 4 जून रोजी बंद
मध्य रेल्वेच्या ‘जम्बो ब्लॉक’मुळे प्रवासी संघटनांचा संताप