दिवा ते सीएसएमटी जलद लोकलची श्रीकांत शिंदे यांची मागणी
सोमवारी कसाराहून मुंबईला (mumbai) जाणाऱ्या एका ट्रेनमध्ये मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान मोठा अपघात झाला. लोकलमधून पडून सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांनी रेल्वेकडे मोठी मागणी केली आहे.लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी आणि अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (shrikant shinde) यांनी दिवा (DIVA) ते सीएसएमटी (CSMT) जलद लोकल सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. कल्याण-कर्जत परिसरात मोठ्या संख्येने नागरिक राहतात. त्यामुळे या मार्गावर लोकल गाड्यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. लोकल गाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून सातत्याने केली जात आहे.ठाणे-कल्याण पाचवी आणि सहावी लाईन सुरू झाल्यानंतर लोकल गाड्यांची संख्या काही प्रमाणात वाढली आहे, परंतु पाचवी आणि सहावी लाईन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत वाढवण्याची गरज आहे. रेल्वे प्रशासन यावर काम करत आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर लोकल गाड्यांची संख्या आणखी वाढेल असा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.हेही वाचाअकरावीची पहिली प्रवेश यादी 26 जूनला जाहीर होणारमुंबई लोकल अपघाताच्या संख्येत मोठी वाढ
Home महत्वाची बातमी दिवा ते सीएसएमटी जलद लोकलची श्रीकांत शिंदे यांची मागणी
दिवा ते सीएसएमटी जलद लोकलची श्रीकांत शिंदे यांची मागणी
सोमवारी कसाराहून मुंबईला (mumbai) जाणाऱ्या एका ट्रेनमध्ये मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान मोठा अपघात झाला. लोकलमधून पडून सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांनी रेल्वेकडे मोठी मागणी केली आहे.
लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी आणि अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (shrikant shinde) यांनी दिवा (DIVA) ते सीएसएमटी (CSMT) जलद लोकल सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
कल्याण-कर्जत परिसरात मोठ्या संख्येने नागरिक राहतात. त्यामुळे या मार्गावर लोकल गाड्यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. लोकल गाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून सातत्याने केली जात आहे.
ठाणे-कल्याण पाचवी आणि सहावी लाईन सुरू झाल्यानंतर लोकल गाड्यांची संख्या काही प्रमाणात वाढली आहे, परंतु पाचवी आणि सहावी लाईन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत वाढवण्याची गरज आहे.
रेल्वे प्रशासन यावर काम करत आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर लोकल गाड्यांची संख्या आणखी वाढेल असा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.हेही वाचा
अकरावीची पहिली प्रवेश यादी 26 जूनला जाहीर होणार
मुंबई लोकल अपघाताच्या संख्येत मोठी वाढ