आंजर्ले येथे छत्रपती शिवाजी महाराजांवर टिंगलटवाळी करणाऱ्यांना शिवप्रेमींनी तोंडाला काळे फासले

कोकणातील दापोलीतील आंजर्ले येथे बुधवारी काही जण दीपस्तंभानजीक फिरायला गेले असता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची गाण्यात एकेरी उल्लेख करून टिंगलटवाळी केल्याची धक्कादायक घटना घडली असून याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर तीव्र पडसाद उमटले

आंजर्ले येथे छत्रपती शिवाजी महाराजांवर टिंगलटवाळी करणाऱ्यांना शिवप्रेमींनी तोंडाला काळे फासले

social media

कोकणातील दापोलीतील आंजर्ले येथे बुधवारी काही जण दीपस्तंभानजीक फिरायला गेले असता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची गाण्यात एकेरी उल्लेख करून टिंगलटवाळी केल्याची धक्कादायक घटना घडली असून याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर तीव्र पडसाद उमटले आणि संतप्त  शिवप्रेमींनी आणि स्थानिकांनी  टिंगलटवाळी करणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बोलवून माफी मागायला लावली आणि  टिंगलटवाळी करणाऱ्यांच्या तोंडाला काळे फासले.

या वेळी दापोली पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. स्थानिकांनी आणि शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.   

घडलेल्या प्रकारावर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला असून  संबंधितांनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितल्यावर त्यांच्याकडून माफीनामा लिहून घेतला त्यामुळे हा विषय थांबविला.माफीनामा पोलिसांकडे देण्यात आला. 

Edited By – Priya Dixit 

 

Go to Source