पुरुषाने महिलेचा वेष धरून भरले 30 अर्ज, लाडकी बहीण योजनेत सरकारला लावला चुना, भिंग फुटले
सध्या राज्यात लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला असून सुमारे 1 कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून महिलांच्या खात्यात पहिला हफ्ता जमा झाला आहे. खरंतर ही योजना राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आहे. मात्र अकोल्यात एका पुरुषाने लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केला हे भिंग उघड आल्यावर आता एक अजून मोठा घोटाळा समोर आला आहे. साताऱ्यात एका पुरुषाने एक नाही दोन नाही तब्बल 30 वेळा महिलेचा वेष धरून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला. एवढेच नाही तर त्याच्या खात्यात 26 अर्जाचे पैसे देखील जमा झाले. या गैरव्यवहाराचा फटका इतर महिलांना पडत आहे.
काय आहे हे प्रकरण-
मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा अर्ज 30 वेळा दाखल केला असून त्याने महिलेचा वेष धरून अर्ज दाखल केला.त्याला प्रत्येक अर्जाचे पैसे देखील मिळाले. या भामट्याने अर्ज दाखल करण्यासाठी विविध आधार क्रमांकाचा वापर केला.
नवी मुंबईतील एका महिलेच्या मोबाईल नंबर वर लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरल्याचा मेसेज आल्यावर महिलेने याची तक्रार केल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला.या व्यक्तीने पनवेलच्या महिलेचा फोटो वापरला.महिलेने तक्रार केल्यावर हा प्रकार समोर आला.
पनवेलच्या तहसील कार्यालयाने आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरचा शोध लावला आणि त्यावर कॉल करून योजनेशी संबंधित माहिती देत एका प्रक्रियेसाठी ओटीपी मागितला तेव्हा सिस्टम मध्ये 30 लाभार्थींसाठी एकाच मोबाईल नंबरचा वापर केल्याचे उघडकीस झाले. या व्यक्तीने लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकारला चुना लावला आहे.
Edited by – Priya Dixit