आफ्रिकेतील मलावी हापूस मुंबईत दाखल

आफ्रिकेतील मलावी देशातून मलावी हापूस (malawi hapus) आणि दक्षिण आफ्रिकेतील स्थानिक टॉमी अटकिन्स जातीचे आंबे (mangoes) मुंबईत (mumbai) दाखल झाले आहेत. या आंब्यांची आयात डिसेंबर अखेर सुरू राहणार आहे. मुंबई, पुणे, अहमदाबाद, राजकोट आणि दिल्लीत किरकोळ विक्रीसाठी आंबे उपलब्ध असणार आहेत.कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी (vashi) येथील आंब्याचे व्यापारी संजय पानसरे म्हणाले, वाशी बाजार समितीत मलावी हापूसचे तीन किलोचे 945 बॉक्स आणि टॉमी अटकिन्सचे चार किलोचे 270 बॉक्स बुधवारी वाशी मार्केटमध्ये (vashi market) दाखल झाले आहेत. हा आंबा मुंबई, पुणे, अहमदाबाद, राजकोट, दिल्ली आदी शहरांत किरकोळ विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा मलावी हापूस प्रती बॉक्स तीन हजार ते पाच हजार रुपये आणि टॉमी अटकिन्स प्रती बॉक्स तीन हजार रुपये दराने किरकोळ बाजारात विक्री होण्याचा अंदाज आहे. दरवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मलावी हापूस मुंबईत दाखल होत असतो. यंदा मलावीत आंब्याचा हंगाम लांबला आहे, शिवाय उत्पादनातही घट झालेली आहे. त्यामुळे मलावी हापूसची आयात तीन आठवडे उशिराने झाली आहे. आता डिसेंबरपर्यंत नियमित आवक होत राहील. दर आठवड्याला सुमारे सात हजार बॉक्सची आवक होण्याची शक्यता आहे. मलावी आंब्याचे मूळ देवगड हापूसमध्ये आहे. सुमारे बारा वर्षांपूर्वी रत्नागिरीतून कलमे करण्यासाठी हापूस आंब्याच्या कलम करण्यायोग्य लहान फांद्या मलावी देशात पाठवण्यात आल्या होत्या. त्यांची कलमे करून सुमारे 26 एकर शेतात लागवड करण्यात आली होती. पुढे क्षेत्रवाढ होऊन आता मलावी देशात सुमारे हजार हेक्टरवर आंबा लागवड झाली आहे. या आंब्याला मलावी हापूस म्हटले जाते. मलावी हापूस आंबे 2018 मध्ये पहिल्यांदा 40 टन आंबे वाशी मार्केटमध्ये आले होते. त्यानंतर सातत्याने मलावी हापूस आंब्यांची आवक होत राहिली आहे, असेही पानसरे म्हणाले.हेही वाचा विधानसभेतील पराभवानंतर दोन्ही ठाकरे एकत्र येणार का? पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या 13 फेऱ्यांमध्ये वाढ

आफ्रिकेतील मलावी हापूस मुंबईत दाखल

आफ्रिकेतील मलावी देशातून मलावी हापूस (malawi hapus) आणि दक्षिण आफ्रिकेतील स्थानिक टॉमी अटकिन्स जातीचे आंबे (mangoes) मुंबईत (mumbai) दाखल झाले आहेत. या आंब्यांची आयात डिसेंबर अखेर सुरू राहणार आहे. मुंबई, पुणे, अहमदाबाद, राजकोट आणि दिल्लीत किरकोळ विक्रीसाठी आंबे उपलब्ध असणार आहेत.कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी (vashi) येथील आंब्याचे व्यापारी संजय पानसरे म्हणाले, वाशी बाजार समितीत मलावी हापूसचे तीन किलोचे 945 बॉक्स आणि टॉमी अटकिन्सचे चार किलोचे 270 बॉक्स बुधवारी वाशी मार्केटमध्ये (vashi market) दाखल झाले आहेत. हा आंबा मुंबई, पुणे, अहमदाबाद, राजकोट, दिल्ली आदी शहरांत किरकोळ विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा मलावी हापूस प्रती बॉक्स तीन हजार ते पाच हजार रुपये आणि टॉमी अटकिन्स प्रती बॉक्स तीन हजार रुपये दराने किरकोळ बाजारात विक्री होण्याचा अंदाज आहे.दरवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मलावी हापूस मुंबईत दाखल होत असतो. यंदा मलावीत आंब्याचा हंगाम लांबला आहे, शिवाय उत्पादनातही घट झालेली आहे. त्यामुळे मलावी हापूसची आयात तीन आठवडे उशिराने झाली आहे. आता डिसेंबरपर्यंत नियमित आवक होत राहील. दर आठवड्याला सुमारे सात हजार बॉक्सची आवक होण्याची शक्यता आहे.मलावी आंब्याचे मूळ देवगड हापूसमध्ये आहे. सुमारे बारा वर्षांपूर्वी रत्नागिरीतून कलमे करण्यासाठी हापूस आंब्याच्या कलम करण्यायोग्य लहान फांद्या मलावी देशात पाठवण्यात आल्या होत्या. त्यांची कलमे करून सुमारे 26 एकर शेतात लागवड करण्यात आली होती. पुढे क्षेत्रवाढ होऊन आता मलावी देशात सुमारे हजार हेक्टरवर आंबा लागवड झाली आहे. या आंब्याला मलावी हापूस म्हटले जाते. मलावी हापूस आंबे 2018 मध्ये पहिल्यांदा 40 टन आंबे वाशी मार्केटमध्ये आले होते. त्यानंतर सातत्याने मलावी हापूस आंब्यांची आवक होत राहिली आहे, असेही पानसरे म्हणाले.हेही वाचाविधानसभेतील पराभवानंतर दोन्ही ठाकरे एकत्र येणार का?पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या 13 फेऱ्यांमध्ये वाढ

Go to Source