राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 3 सप्टेंबरला मतदान

भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.  राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा कार्यकाळ 5 एप्रिल 2026 आणि राज्यसभा खासदार पियुष वेदप्रकाश गोयल यांचा कार्यकाळ 4 जुलै 2028 आहे. मात्र, 18 व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत श्री.भोसले आणि श्री. गोयल यांच्या विजयामुळे त्यांच्या जागा रिक्त आहेत. यामुळे पुन्हा निवडणूक घेण्याची आवश्यक्ता आहे. त्यानुसार, राज्यसभा पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या पोटनिवडणुकीची अधिसूचना बुधवार, 14 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध केली जाईल. नामनिर्देशन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख बुधवार, 21 ऑगस्ट, 2024 आहे आणि अर्जांची छाननी गुरुवार, 22 ऑगस्ट, 2024 रोजी होईल. नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख सोमवार, 26 ऑगस्ट 2024 आहे आणि मतदान मंगळवार, 3 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत होईल. या पोटनिवडणुकीची मतमोजणी त्याच दिवशी म्हणजेच 3 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता सुरू होईल. ही संपूर्ण प्रक्रिया शुक्रवार, 6 सप्टेंबर, 2024 रोजी पूर्ण केली जाईल, अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.हेही वाचा ‘आप’ मुंबईत विधानसभेच्या सर्व 36 जागा लढवणारमहाराष्ट्र : 7 औद्योगिक प्रकल्पांना मंजुरी

राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 3 सप्टेंबरला मतदान

भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा कार्यकाळ 5 एप्रिल 2026 आणि राज्यसभा खासदार पियुष वेदप्रकाश गोयल यांचा कार्यकाळ 4 जुलै 2028 आहे. मात्र, 18 व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत श्री.भोसले आणि श्री. गोयल यांच्या विजयामुळे त्यांच्या जागा रिक्त आहेत. यामुळे पुन्हा निवडणूक घेण्याची आवश्यक्ता आहे. त्यानुसार, राज्यसभा पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.या पोटनिवडणुकीची अधिसूचना बुधवार, 14 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध केली जाईल. नामनिर्देशन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख बुधवार, 21 ऑगस्ट, 2024 आहे आणि अर्जांची छाननी गुरुवार, 22 ऑगस्ट, 2024 रोजी होईल. नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख सोमवार, 26 ऑगस्ट 2024 आहे आणि मतदान मंगळवार, 3 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत होईल. या पोटनिवडणुकीची मतमोजणी त्याच दिवशी म्हणजेच 3 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता सुरू होईल. ही संपूर्ण प्रक्रिया शुक्रवार, 6 सप्टेंबर, 2024 रोजी पूर्ण केली जाईल, अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.हेही वाचा’आप’ मुंबईत विधानसभेच्या सर्व 36 जागा लढवणार
महाराष्ट्र : 7 औद्योगिक प्रकल्पांना मंजुरी

Go to Source