LIVE: मुंबईत तैनात असलेल्या एफसीआय अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक
Maharashtra Marathi Breaking News Live Today : २० लाख रुपयांच्या लाचखोरी प्रकरणात सीबीआयने एफसीआयच्या सहाय्यक महाव्यवस्थापकासह चार जणांना अटक केली आहे. सीबीआयने ९ मे रोजी सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.
२० लाख रुपयांच्या लाचखोरी प्रकरणात सीबीआयने एफसीआयच्या सहाय्यक महाव्यवस्थापकासह चार जणांना अटक केली आहे. सीबीआयने ९ मे रोजी सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सविस्तर वाचा
खरीप हंगामात पेरणीसाठी विविध बँकांकडून घेतलेले कर्ज तो फेडू शकला नाही. खरीप हंगामात पेरणीसाठी पैसे कुठून उभे करायचे या चिंतेने, एका ३५ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सविस्तर वाचा