‘प्रवाह’च्या पाहणीमुळे कर्नाटकच्या पोटात दुखू लागले

‘प्रवाह’च्या पाहणीमुळे कर्नाटकच्या पोटात दुखू लागले

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची प्रतिक्रिया : ‘प्रवाह’चा अहवाल गोव्याच्या बाजूने येईल
पणजी : ‘प्रवाह’ समितीने म्हादई नदीची पाहणी केल्यामुळे वस्तुस्थिती समोर आली असून त्यामुळे कर्नाटकच्या पोटात दुखू लागल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्याची कदंब बस अडवून बेळगावात निदर्शने करण्यात आली आहेत, म्हणजेच गोव्याचे प्रयत्न योग्य दिशेने सुरू असल्याचा दावा डॉ. सावंत यांनी केला आहे. ‘प्रवाह’चा अहवाल गोव्याच्या बाजूने येईल, अशी खात्री त्यांनी वर्तवली आहे.
‘प्रवाह’च्या पाहणीत कर्नाटकचे पितळ उघडे पडले असून त्याचा परिणाम म्हणून आता पोटशूळ सुऊ झाला आहे. ‘प्रवाह’ने पावसात पाहणी केल्यामुळे खरे काय ते समितीला कळून चुकले आहे. त्याचा अहवाल यानंतर केंद्र सरकार तसेच सर्वोच्च न्यायालयास सादर केला जाणार असून तेव्हाच खरे सत्य उघडकीस येईल, असे डॉ. सावंत यांनी नमूद केले. ‘प्रवाह’च्या पथकाने पाहणी करावी अशी गोवा सरकारची मागणी होती. ती आता पूर्ण झाली असून त्याचा खरा फायदा गोवा राज्याला होणार असल्याचे डॉ. सावंत म्हणाले.
प्रवाह योग्य निकाल देणार असून तो गोव्याच्याच हिताचा ठरणार आहे. ‘प्रवाह’ स्वतंत्र असल्यामुळे त्यात कोणी ढवळाढवळ कऊ शकत नाही. सर्वांनी ‘प्रवाह’साठी सहकार्य करावे तसेच म्हादई वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज डॉ. सावंत यांनी व्यक्त केली. पावसामुळे राज्यात विविध ठिकाणी मोठे नुकसान झाले असून त्याची भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली.