14 महिन्यांपूर्वी अपहरण, जयपूरमध्ये अपहरणकर्त्याला मिठी मारून रडला निरागस मुलगा

राजस्थानची राजधानी जयपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या 14 महिन्यांपूर्वी मुलाचे अपहरण करणारा आरोपी पकडला गेला आहे. आरोपीला पकडून मुलाला ताब्यात देण्यात आले तेव्हा मुलाने आरोपीला घट्ट मिठी मारली आणि रडायला सुरुवात केली. तसेच या मुलाची ही …

14 महिन्यांपूर्वी अपहरण, जयपूरमध्ये अपहरणकर्त्याला मिठी मारून रडला निरागस मुलगा

राजस्थानची राजधानी जयपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या 14 महिन्यांपूर्वी मुलाचे अपहरण करणारा आरोपी पकडला गेला आहे. आरोपीला पकडून मुलाला ताब्यात देण्यात आले तेव्हा मुलाने आरोपीला घट्ट मिठी मारली आणि रडायला सुरुवात केली. तसेच या मुलाची ही भावनिक प्रतिक्रिया पाहून आरोपीलाही आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि तोही रडू लागला. तसेच या दृश्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे.

 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार 14 जून 2023 रोजी, एका 11 महिन्यांच्या मुलाचे जयपूरच्या सांगानेर येथून अपहरण करण्यात आले होते. तसेच 14 महिन्यांनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन आरोपीला अटक केली व मुलाला ताब्यात घेतले. तसेच मुलाला त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले असता, मूल अपहरणकर्त्याला सोडण्यास तयार नव्हते आणि जोरजोरात रडू लागले. तसेच अपहरणकर्त्याचे देखील डोळे पाणावले. हे दृश्य पाहून पोलिसांचेही डोळे भरून आले.

 

मिळालेल्या माहितीनुसार, तनुज चहर असे आरोपीचे नाव असून तो उत्तर प्रदेश पोलिसात हेड कॉन्स्टेबल होता आणि सध्या तो निलंबित आहे. तसेच त्याने मुलाला आपल्या बंदिवासात सुरक्षित ठेवले आणि त्याला नवीन कपडे आणि खेळणी सुद्धा देखील दिली. आरोपीने आपला वेश बदलला होता, दाढी-मिशा वाढवल्या होत्या आणि साधूसारखे भगवे वस्त्र परिधान केले होते. पण, पोलिसांनी त्याला अलीगड येथून अटक केली आणि जयपूर पोलिसांनी त्याच्या अटकेची खात्री केली. या भावनिक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यात मुल आणि अपहरणकर्त्याच्या दुराव्याची दृश्ये पाहायला मिळत आहेत.

Go to Source