भारतीय रेल्वेचे पॅन-इंडिया सुरक्षा मोबाइल ॲप लाँच
भारतीय रेल्वेने संरक्षा मोबाईल अॅप्लिकेशन लाँच करून प्रवाशांच्या सुरक्षेच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. भारतीय रेल्वेच्या फ्रंटलाइन सेफ्टी श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या क्षमता वाढवण्याद्वारे रेल्वे सुरक्षा सुधारणे हा यामागचा उद्देश आहे.यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण आणि क्षमता वाढीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक बुद्धिमान, प्रभावी आणि स्केलेबल प्रणाली प्रदान केली जाते. यात स्मार्ट लर्निंग आणि फीडबॅक मेकॅनिझम आहे, ज्यामुळे बहु-स्तरीय, रिअल टाइम फीडबॅक आणि मॉनिटरिंग शक्य होते. रविंदर गोयल, सदस्य, संचालन आणि व्यवसाय विकास, रेल्वे बोर्ड, यांनी संरक्षा मोबाईल अॅप्लिकेशन लाँच केले. 2013 बॅचचे IRTS अधिकारी दिलीप सिंग यांनी याची रचना केली आहे, जे सध्या वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर म्हणून कार्यरत आहेत. रेल्वेने हे ॲप सर्व झोनल रेल्वेमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सुरुवातीला 16 मंडळे रोलआउटसाठी निवडण्यात आली आहेत. हेही वाचाNMMT कडून उरणमध्ये बससेवा पुन्हा सुरू
वसई-विरार मॅरेथॉनसाठी 8 डिसेंबरला स्पेशल ट्रेन्स धावणार
Home महत्वाची बातमी भारतीय रेल्वेचे पॅन-इंडिया सुरक्षा मोबाइल ॲप लाँच
भारतीय रेल्वेचे पॅन-इंडिया सुरक्षा मोबाइल ॲप लाँच
भारतीय रेल्वेने संरक्षा मोबाईल अॅप्लिकेशन लाँच करून प्रवाशांच्या सुरक्षेच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. भारतीय रेल्वेच्या फ्रंटलाइन सेफ्टी श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या क्षमता वाढवण्याद्वारे रेल्वे सुरक्षा सुधारणे हा यामागचा उद्देश आहे.
यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण आणि क्षमता वाढीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक बुद्धिमान, प्रभावी आणि स्केलेबल प्रणाली प्रदान केली जाते. यात स्मार्ट लर्निंग आणि फीडबॅक मेकॅनिझम आहे, ज्यामुळे बहु-स्तरीय, रिअल टाइम फीडबॅक आणि मॉनिटरिंग शक्य होते.
रविंदर गोयल, सदस्य, संचालन आणि व्यवसाय विकास, रेल्वे बोर्ड, यांनी संरक्षा मोबाईल अॅप्लिकेशन लाँच केले. 2013 बॅचचे IRTS अधिकारी दिलीप सिंग यांनी याची रचना केली आहे, जे सध्या वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर म्हणून कार्यरत आहेत.
रेल्वेने हे ॲप सर्व झोनल रेल्वेमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सुरुवातीला 16 मंडळे रोलआउटसाठी निवडण्यात आली आहेत. हेही वाचा
NMMT कडून उरणमध्ये बससेवा पुन्हा सुरूवसई-विरार मॅरेथॉनसाठी 8 डिसेंबरला स्पेशल ट्रेन्स धावणार