भारतीय वंशाच्या डॉक्टरची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या

भारतीय वंशाचे प्रसिद्ध डॉक्टर रमेश बाबू पेरामसेट्टी यांची शुक्रवारी अमेरिकेतील अलाबामा राज्यातील तुस्कालूसा शहरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मिळलेल्या माहितीनुसार 38 वर्षांचा वैद्यकीय अनुभव असलेले डॉ. पेरामसेट्टी यांचा घटनास्थळी जागीच मृत्यू …

भारतीय वंशाच्या डॉक्टरची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या

भारतीय वंशाचे प्रसिद्ध डॉक्टर रमेश बाबू पेरामसेट्टी यांची शुक्रवारी अमेरिकेतील अलाबामा राज्यातील तुस्कालूसा शहरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मिळलेल्या माहितीनुसार 38 वर्षांचा वैद्यकीय अनुभव असलेले डॉ. पेरामसेट्टी यांचा घटनास्थळी जागीच मृत्यू झाला. डॉ. पेरामसेट्टी हे आंध्रप्रदेशातील तिरुपती जिल्ह्यातील राहणारे होते आणि ते तुस्कालुसा येथे प्रमुख वैद्य म्हणून कार्यरत होते. 

 

तसेच त्यांनी ‘क्रिमसन नेटवर्क’ नावाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गटाची स्थापना केली होती, जिथे त्यांनी वैद्यकीय संचालक म्हणूनही काम केले होते. आरोग्य सेवेतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे ते तुस्कालूसामध्ये प्रसिद्ध होते. डॉ. पेरामसेट्टी यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, दोन मुल आणि दोन मुली यांचा समावेश आहे, जे सर्व अमेरिकेत स्थायिक आहेत.

Edited By- Dhanashri Naik 

Go to Source