IND vs BAN:या 31 वर्षीय खेळाडूने प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार जिंकला
भारताने बांगलादेशचा 3-0 असा पराभव करत तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत क्लीन स्वीप पूर्ण केला. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने 133 धावांनी विजय मिळवला.
भारताकडून संजू सॅमसनने 111 धावांची खेळी केली, तर कर्णधार सूर्यकुमारने 75 धावांची तुफानी खेळी केली.
भारताने 20 षटकांत 6 बाद 297 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 164 धावाच करू शकला. सॅमसनला त्याच्या शानदार खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
सॅमसनला त्याच्या शानदार खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. मात्र, 31 वर्षीय स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावला. हार्दिकने शुक्रवारी 11 ऑक्टोबर रोजी आपला 31 वा वाढदिवस साजरा केला. त्याच्यासाठी यापेक्षा चांगली भेट असूच शकत नाही.
हार्दिकने भारतासाठी तिन्ही टी-20 सामने खेळले आणि 11 चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने एकूण 118 धावा केल्या. T20 मालिकेत सर्वाधिक धावा करणारा तो दुसऱ्या क्रमांकावर होता.
ग्वाल्हेरमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात हार्दिकने चार षटकात 26 धावा देत एक बळी घेतला होता.प्लेअर ऑफ द सीरीजचा पुरस्कार जिंकल्यानंतर हार्दिकने प्रशिक्षक गौतम गंभीरचे कौतुक केले. कॅप्टन सूर्यकुमारनेही हार्दिकचे कौतुक केले.
Edited By – Priya Dixit