कर्नाटकमध्ये मोबाईलचा अतिवापर केल्याबद्दल पालकांनी रागावले, मुलाने विहिरीत उडी घेत केली आत्महत्या

कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील हिरियाडाका येथे 16 वर्षीय विद्यार्थ्याने मोबाईलचा अति वापर केल्याबद्दल पालकांनी रागवल्यामुळे विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 वर्षीय विद्यार्थी सोमवारपासून बेपत्ता झाल्यानंतर …

कर्नाटकमध्ये मोबाईलचा अतिवापर केल्याबद्दल पालकांनी रागावले, मुलाने विहिरीत उडी घेत केली आत्महत्या

कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील हिरियाडाका येथे 16 वर्षीय विद्यार्थ्याने मोबाईलचा अति वापर केल्याबद्दल पालकांनी रागवल्यामुळे विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे.  

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,16 वर्षीय विद्यार्थी सोमवारपासून बेपत्ता झाल्यानंतर पोलीस आणि त्याचे कुटुंबीय त्याचा शोध घेत होते, पण मंगळवारी त्याचा मृतदेह विहिरीत सापडला. मिळालेल्या माहितीनुसार  हा विद्यार्थी सोमवारी सायंकाळी कॉलेजमधून घरी परतला नाही तेव्हा त्याचे पालक आणि नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला. मंगळवारी सकाळी त्यांना त्याची शाळेची बॅग विहिरीजवळ सापडली आणि नंतर त्याच विहिरीत त्याचा मृतदेह सापडला.

 

मिळालेल्या माहितीनुसार मोबाइल फोनचा अतिवापर केल्याबद्दल त्याच्या पालकांनी एक दिवसापूर्वी त्याला रागावले होते. याकरिता त्याने हे पाऊल उचलेले. या घटनेसंदर्भात हिरियाडका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टम करून मंगळवारीच कुटुंबीयांच्या ताब्यात देऊन अंतिम संस्कार करण्यात आले.

Edited By- Dhanashri Naik 

Go to Source