म्हादई योजना त्वरित राबवा

भारतीय कृषक समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बेळगाव : उत्तर कर्नाटकातील नागरिकांसाठी महत्त्वाकांक्षी असणारी कळसा-भांडुरा म्हादई योजना राबविण्यात गोवा सरकारकडून आडकाठी आणली जात आहे. याचा निषेध करत भारतीय कृषक समाजातर्फे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन राज्य सरकारने त्वरित योजना राबवावी, अशी मागणी करण्यात आली. उत्तर कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांसाठी ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. यामुळे या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. मात्र, […]

म्हादई योजना त्वरित राबवा

भारतीय कृषक समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : उत्तर कर्नाटकातील नागरिकांसाठी महत्त्वाकांक्षी असणारी कळसा-भांडुरा म्हादई योजना राबविण्यात गोवा सरकारकडून आडकाठी आणली जात आहे. याचा निषेध करत भारतीय कृषक समाजातर्फे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन राज्य सरकारने त्वरित योजना राबवावी, अशी मागणी करण्यात आली. उत्तर कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांसाठी ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. यामुळे या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. मात्र, गोवा राज्याकडून योजना राबविण्यात आडकाठी आणून प्रकरण न्यायालयात गेले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे.
म्हादई योजनेत राजकारण आणू नका
नुकतीच समन्वय पथकाने कणकुंबीला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. राज्य सरकारने सदर योजना तातडीने राबवून या भागातील जनतेला पाण्याची सोय करून देण्यात यावी. यामध्ये राजकारण करण्यात येऊ नये, अशी मागणीही करण्यात आली.