भुजबळांना जर बीडच्या सभेला यायचं असेल तर त्यांनी राजीनामा देऊन यावं

बीडमध्ये शनिवार, दि. १३ जानेवारी रोजी ओबीसी महाएल्गार सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेला ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहतील.

भुजबळांना जर बीडच्या सभेला यायचं असेल तर त्यांनी राजीनामा देऊन यावं

बीडमध्ये शनिवार, दि. १३ जानेवारी रोजी ओबीसी महाएल्गार सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेला ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहतील. पण बीडमधील या महाएल्गार सभेला मराठा आंदोलकांनी विरोध दर्शवला आहे. तसेच भुजबळांना जर बीडच्या सभेला यायचं असेल तर त्यांनी राजीनामा देऊन यावं, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

 

ओबीसीतूनच मराठा आरक्षण हवे या भूमिकेवर मनोज जरांगे ठाम आहेत, तर ओबीसीतून मराठा आरक्षण देऊ देणार नाही, अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतलीे. त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात ओबीसी महाएल्गार सभेचं आयोजन करण्यात येत आहे.

 

प्रशासनाने परवानगी नाकारावी

एकीकडे मराठा आंदोलकांकडून भुजबळांच्या सभेला विरोध होत आहे. तसेच दुसरीकडे प्रशासनाने देखील या आंदोलकांना परवानगी नाकारावी अशी मागणी देखील या आंदोलकांनी केली. त्यामुळे उद्या बीडमध्ये होणा-या ओबीसी महाएल्गार मेळाव्यात छगन भुजबळ काय बोलणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

 

Edited By –  Ratnadeep ranshoor

Go to Source