बेंगळूरच्या केंपेगौडा विमानतळावर 6.97 कोटींचा हायड्रो गांजा जप्त

बेंगळूर : येथील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत 6.97 कोटी रुपयांचा हायड्रो गांजा जप्त केला आहे. 11 आणि 12 नोव्हेंबर रोजी या कारवाया करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. बँकॉकहून बेंगळूर विमानतळावर आलेल्या प्रवाशाविषयी संशय आल्याने कस्टम अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली. यावेळी 69.60 लाख रुपये किमतीचा 2 किलो 760 ग्रॅम हायड्रो गांजा […]

बेंगळूरच्या केंपेगौडा विमानतळावर 6.97 कोटींचा हायड्रो गांजा जप्त

बेंगळूर : येथील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत 6.97 कोटी रुपयांचा हायड्रो गांजा जप्त केला आहे. 11 आणि 12 नोव्हेंबर रोजी या कारवाया करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. बँकॉकहून बेंगळूर विमानतळावर आलेल्या प्रवाशाविषयी संशय आल्याने कस्टम अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली. यावेळी 69.60 लाख रुपये किमतीचा 2 किलो 760 ग्रॅम हायड्रो गांजा जप्त केला. सदर प्रवाशाला एनडीपीएस कायदा-1984 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 12 नोव्हेंबर रोजी याच विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी दोन प्रवाशांची तपासणी करून 15.79 किलो हायड्रो गांजा जप्त केला आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारात 5.53 कोटी रुपये किंमत असल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही प्रवाशांविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे.