हरमल पं. उ. माध्यमिकमध्ये नाताळ उत्साहात

हरमल : विद्यार्थ्यांनी येशू ख्रिस्ताच्या जन्माचा देखावा (गोठा) तयार करून  हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या उच्च माध्यमिक व व्यावसायिक विभागातर्फे नाताळ सण उत्साहात साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांनी येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी व नंतरचा इतिहास नाटिकेतून उलगडून दाखवला. पॅरोल गायन, नृत्य व प्रार्थना गायन करून विद्यार्थ्यांनी नाताळ  साजरा केला. सांताक्लॉज झालेल्या विद्यार्थ्याने आपल्या खास शैलीत प्राचार्य, अध्यापक तसेच […]

हरमल पं. उ. माध्यमिकमध्ये नाताळ उत्साहात

हरमल : विद्यार्थ्यांनी येशू ख्रिस्ताच्या जन्माचा देखावा (गोठा) तयार करून  हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या उच्च माध्यमिक व व्यावसायिक विभागातर्फे नाताळ सण उत्साहात साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांनी येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी व नंतरचा इतिहास नाटिकेतून उलगडून दाखवला. पॅरोल गायन, नृत्य व प्रार्थना गायन करून विद्यार्थ्यांनी नाताळ  साजरा केला. सांताक्लॉज झालेल्या विद्यार्थ्याने आपल्या खास शैलीत प्राचार्य, अध्यापक तसेच मुलांना चॅकलेट्सचे वाटप केले. यावेळी व्यवस्थापिका स्मिता पार्सेकर यांनी ख्रिस्ती बांधवांना नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यालयात सर्व धर्म समभाव मानण्यात येत असून श्री गणेश चतुर्थी व नाताळ सण  मोठ्या उत्साहात साजरा केले जातात, अशी माहिती व्यवस्थापिका स्मिता पार्सेकर यांनी दिली. व्यवस्थापिका स्मिता पार्सेकर यांनी मेणबत्ती प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.  यावेळी पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष विनोद मेथर, प्राचार्य शांभवी नाईक, कॉलेजचे प्राचार्य उदेश नाटेकर व नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य किऊपा पॉल उपस्थित होत्या. लारा फर्नांडिस यांनी स्वागत करून आभार मानले.